अक्कलकोट तालुक्‍यात मुलींची बाजी; एकूण निकाल 90.70 टक्के 

Akkalkot taluka 12th result
Akkalkot taluka 12th result

अक्कलकोट (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्‍याचा निकाल 90.70 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 
तालुक्‍यातील विविध शाळा व महाविद्यालयातून एकूण 2871 विद्यार्थ्यांपैकी 2 हजार 850 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात 147 विषेश प्राविण्य, 1054 प्रथम श्रेणी, 1188 द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांची टक्केवारी 87.86 तर मुलींची टक्केवारी 95.25 इतकी आहे. यावर्षी मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा 7.40 टक्‍यांनी जास्त आहे. 

तालुक्‍यातील विविध उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल टक्केवारीत : सी. बी. खेडगी कॉलेज, अक्कलकोट (88.28), मंगरूळे उच्च माध्यमिक प्रशाला (88.28), काशिराया काका पाटील उच्च माध्यमिक प्रशाला, अक्कलकोट (65.85), बसवराज उच्च माध्यमिक प्रशाला, करजगी (96), एच. जी. प्रचंडे उच्च माध्यमिक प्रशाला, नागणसूर (94.45), सिद्धरामेश्वर उच्च माध्यमिक प्रशाला, तोळणूर (89.18), अनंत चैतन्य उच्च माध्यमिक प्रशाला, हन्नूर (95.74), मातोश्री गुरुशांतवा कल्याणशेट्टी उच्च माध्यमिक प्रशाला, अक्कलकोट (93.93), मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय, केगांव (77.77), ग्रामीण विद्याविकास ज्युनिअर कॉलेज, चपळगाव (98.79), एस. एस शेळके उच्च माध्यमिक विद्यालय, वागदरी (87.50), श्री शिवचलेश्वर महाविद्यालय, मैंदर्गी (91.93), श्री गुरुशांतलिंगेश्वर महाविद्यालय, दुधनी (96.55), श्री. जे. पी. उच्च माध्यमिक विद्यालय, गौडगांव (81.39), धोंडूबाई स्वामी उच्च माध्यमिक विद्यालय, चुंगी (97.36), जयशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, तडवळ (96.45), सिध्दाराम म्हेत्रे ज्युनिअर कॉलेज, अक्कलकोट स्टेशन (80.95), एस. एस. म्हेत्रे ज्युनिअर आश्रम महाविद्यालय, रुद्देवाडी (95.09), कै. परशुराम जाधव ज्युनिअर कॉलेज, कोन्हाळी (70.27), के. एस. एम. ज्युनिअर कॉलेज, नागनहळ्ळी (98.14), कै. हरिश्‍चंद्र राठोड ज्युनिअर कॉलेज, कडबगांव (89.21), काशीविश्वेश्वर उच्च माध्यमिक प्रशाला, जेऊर (96.87), अल हज जैनब बी उर्दू माध्यमिक विद्यालय, मैंदर्गी (92.53), एस. बी. खेडगी व्होकेशनल (90.80), ग्रामीण विद्याविकास, चपळगाव व्होकेशनल (98.48), बसवराज व्होकेशनल महाविद्यालय, करजगी (94.54) 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com