अक्कलकोट तालुक्‍यात बंधारे व तलावातील जलसाठे वाढण्यासाठी पावसाची हवी साथ 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 23 September 2020

तालुक्‍यातील लघुपाटबंधारे तलावातील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहेत तर कंसात सध्याच्या 22 सप्टेंबरचा एकूण साठा आणि त्याची टक्केवारी ही अशी आहे. गळोरगी 2.08 (1.461) 70 टक्के, शिरवळवाडी 3.26 (2.19) 67 टक्के, चिक्केहळ्ळी, 1.90 (0) 0 टक्के, हंजगी1.81 (0.41) 23 टक्के, 
काजीकणबस 4.03 (0.565) 14 टक्के, बोरगांव 2.11 (2.11) 100 टक्के, घोळसगांव 2.083(2.083) 100 टक्के, सातनदुधनी1.98 (0) 0 टक्के, भुरीकवठे 1.97 (1.97) 100 टक्के एवढा पाणी साठा आहे. 

अक्कलकोट(सोलापूर): अक्कलकोट तालुक्‍यात पावसाळा सुरू होऊन साडेतीन महिने झाली तरी एखादा दुसरा भाग वगळता रिमझिम किंवा खरीप पिके जिवंत राहतील आणि त्यात तण जोपासला एवढा पाऊस झाला तर काही भागात मोठा पाऊस होऊन पिके वाया गेली. सध्या उपलब्ध असणारे जलसाठे हे सर्वत्र समान न भरता काही शंभर टक्के तर काही शून्य टक्के एवढे भरले आहेत. येत्या काळातली पावसाची उत्तरा, हस्ता आणि चित्रा ही सहा नक्षत्रामध्ये पावसाने नेहमीप्रमाणे साथ दिली तरच पुन्हा तालुक्‍याच्या शेतीच्या आशा पल्लवित झालेल्या दिसतील. 

हेही वाचाः कृषी विधेयकाद्वारे शेती व शेतकरी मोडीत काढण्याचा प्रयत्न ः जिल्हा युवक कॉंग्रेसचे पंढरपुरात आंदोलन 

तालुक्‍यातील लघुपाटबंधारे तलावातील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहेत तर कंसात सध्याच्या 22 सप्टेंबरचा एकूण साठा आणि त्याची टक्केवारी ही अशी आहे. गळोरगी 2.08 (1.461) 70 टक्के, शिरवळवाडी 3.26 (2.19) 67 टक्के, चिक्केहळ्ळी, 1.90 (0) 0 टक्के, हंजगी1.81 (0.41) 23 टक्के, 
काजीकणबस 4.03 (0.565) 14 टक्के, बोरगांव 2.11 (2.11) 100 टक्के, घोळसगांव 2.083(2.083) 100 टक्के, सातनदुधनी1.98 (0) 0 टक्के, भुरीकवठे 1.97 (1.97) 100 टक्के एवढा पाणी साठा आहे. 

हेही वाचाः अतिवृष्टीचा फटका ! सांगोल्यात महावितरणचे 50 लाखाचे नुकसान 

कर्नाटक सीमेवर असणारी आळगे, खानापूर व हिळ्ळी हे तिन्ही बंधारे पावसाळ्यात शेवटी पूर्ण क्षमतेने नेहमी भरून घेतली जातात. त्यामुळे नदीकाठी असणारी ऊस व तत्सम शेती ही भरपूर पाणी असल्याने समाधानकारक स्थितीत असणार आहेत. 
तालुक्‍यातील पूर्व भागाचे व बोरी नदीपरीसरातील शेतकरी व अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी नगरपरिषद तसेच आणि बोरी नदी खालील बंधारे भरण्याचे ज्यात कोल्हापूर पध्दतीचे किणी 26.13,अक्कलकोट 46.51, निमगांव20.78, मिरजगी 48.90, सातनदुधनी 94.94, संगोळगी 64.95 , रूद्देवाडी 13.69, बबलाद 28.99, बोरी नदी एकूण 8 बंधाऱ्यांच्या एकूण 344.89 दशलक्ष घनमीटर इतक्‍या क्षमतेचा साठ्याचा समावेश आहे.पण सध्या येथे समाधानकारक पाणी साठा उपलब्ध नाही. हे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता कुरनुर धरण 52 टक्के भरले आहे ते 100 टक्के पूर्ण भरून जादा पाणी खाली सोडण्याची वाट पाहावी लागेल. यासाठी धरण पाणलोट क्षेत्रात आणखी एक दोन मोठे पाऊस अपेक्षित आहेत.  
 
संपादन ः प्रकाश सनरपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Akkalkot taluka, rains are required to increase the water storage in dams and lakes