अबब ! अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने मिळवला तब्बल चार अब्जांचा महसूल !

RTO
RTO
Updated on

अकलूज (सोलापूर) : अकलूज येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मोटार वाहन विभागांतर्गत 2004 मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाने गत 16 वर्षांत विविध स्रोतांतून सुमारे चार अब्ज रुपयांचे महसुली उत्पन्न मिळवले आहे. 

अकलूज येथे महाराष्ट्र राज्य शासनाच्या मोटार वाहन विभागांतर्गत 2004 मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाने गत 16 वर्षांमध्ये वाहनांच्या नोंदणी कराद्वारे तीन अब्ज 87 कोटी 95 लाख 62 हजार, वाहनांवर नियमबाह्य वाहतूक केल्याबद्दल दंडात्मक कारवाईतून 25 कोटी 33 लाख 65 हजार रुपये व आकर्षक नंबर विक्रीमधून पाच कोटी 31 लाख पाच हजार 604 रुपये असे एकूण चार अब्ज 18 कोटी 59 लाख 70 हजार 666 रुपयांचे महसुली उत्पन्न मिळवले आहे. 

माळशिरस, माढा, करमाळा व सांगोला या चार तालुक्‍यांतील वाहनधारकांना वाहनांची नोंदणी व कर भरण्याबरोबरच वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी सोलापूरला जावे लागत होते. या चार तालुक्‍यांतील वाहनधारकांच्या वेळेची व पैशाची बचत व्हावी या हेतूने अकलूजला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे, यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी प्रयत्न केले. शासनाच्या मोटार वाहन विभागाने खास बाब म्हणून अकलूज येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास परवानगी दिली. अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गत 16 वर्षांत माळशिरस, माढा, करमाळा व सांगोला या चार तालुक्‍यांतील दोन लाख 19 हजार 955 दुचाकी वाहने, 21 हजार 367 चारचाकी वाहने, 39 हजार 770 ट्रक, ट्रॅक्‍टर, ट्रॉली व इतर वाहने अशी एकूण दोन लाख 81 हजार 092 वाहनांची नोंदणी करून तीन अब्ज 87 कोटी 95 लाख 62 हजार रुपये महसुली उत्पन्न प्राप्त केले आहे. 

आकर्षक नंबरपासून मिळालेले उत्पन्न 
2016-17 मध्ये एक कोटी 44 लाख, 2017-18 मध्ये एक कोटी 66 लाख, 2018-19 मध्ये एक कोटी 44 लाख व 2019-20 मध्ये 77 लाख पाच हजार 604 रुपये असे एकूण पाच कोटी 31 लाख पाच हजार 604 रुपये महसुली उत्पन्न मिळाले आहे. 

भरारी पथकाची कारवाई 
अकलूजच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास 2010 मध्ये भरारी पथकाची मान्यता मिळाली. या कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह तीन वाहन निरीक्षकांची नियुक्ती झाली. 2010 ते 2020 या 10 वर्षांच्या कालावधीत भरारी पथकाने क्षमतेपेक्षा जादा भाराने वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून 25 कोटी 33 लाख 65 हजार रुपयांचे महसुली उत्पन्न मिळवले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city police
solapur
Suryan Mukne from Pandharpur selected as Sub-Lieutenant in Indian Navy
34th Water Struggle Council in Mangalwedha demands completion of irrigation projects
Marathi News Esakal
www.esakal.com