हा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी अथवा दुसरा पर्याय द्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मे 2020

महिलांच्या हाताला काम मिळून रोजगाराची संधी मिळावी यासाठी पशुपालन, गाय, म्हैस, बकरी, कोंबडी पालन, त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय व इतर काही व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत गटांना सहकार्य व प्रोत्साहन मिळावे. कोरोनावर उपयोगी असलेल्या व्हिटॅमिन सी, बी, ई तसेच कॅल्शिअमच्या महिन्यांच्या गोळ्यांचे पाकीट प्रत्येक घरोघरी वाटावे. 

सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांची वेबिनार कॉन्फरन्स घेतली. लॉकडाउन कालावधीत सोलापूरसह महाराष्ट्रातील नाभिक समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे. सलून व्यवसाय बंद असल्याने या समाजाच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सलून व्यवसाय सुरू करावा अथवा त्यांना अन्य पर्याय द्यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा, नगरसेविका अनिता नागणे यांनी प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांच्याकडे केली आहे. 

हेही वाचा- पुळूजचा धनंजय होनमाने नक्षली हल्ल्यात हुतात्मा

बचत गटांना सहकार्य व प्रोत्साहन मिळावे 
सोलापूर जिल्ह्यातील सरकारी ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या असुविधा तसेच राज्यांतर्गत व जिल्हांतर्गत प्रवास करण्यासाठी मेडिकल सर्टिफिकेटसाठी, तपासणीसाठी होत असलेली गर्दी, त्यामुळे उन्हात लोकांना थांबावे लागत असल्याने त्यांच्यासाठी शेडस बांधावेत आणि त्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था व्हावी. महिलांच्या हाताला काम मिळून रोजगाराची संधी मिळावी यासाठी पशुपालन, गाय, म्हैस, बकरी, कोंबडी पालन, त्या अनुषंगाने दुग्ध व्यवसाय व इतर काही व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत गटांना सहकार्य व प्रोत्साहन मिळावे. कोरोनावर उपयोगी असलेल्या व्हिटॅमिन सी, बी, ई तसेच कॅल्शिअमच्या महिन्यांच्या गोळ्यांचे पाकीट प्रत्येक घरोघरी वाटावे. 

हेही वाचा- सासूची सेवा केलेला जावई झाला कोरोनाबाधित

प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार वाटावा 
1972 च्या दुष्काळात सुकडी हा एक पौष्टिक आहार सरकारमार्फत मोफत वाटण्यात आला तसेच या काळात आहार तज्ज्ञांशी सल्लामसलत करून एकदा कोरोना आजार संबंधित प्रतिकारशक्ती वाढवणारा पौष्टिक आहार सामान्य जनतेला वाटावा, आहार बनविण्याचे प्रशिक्षण व काम महिला बचत गटांना द्यावे, अशा मागण्याही प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांच्याकडे केल्याची माहिती जिल्हाध्यक्षा नागणे यांनी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे आश्‍वासन प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी दिल्याचेही जिल्हाध्यक्षा नागणे यांनी सांगितले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allow to start this business or give another option