कोरोनाच्या काळातील अन्नपुर्णा : संगिता भतगुणकी  शेतकरी ते ग्राहक घरपोच भाजीपाला विक्रीतून रोजगारासह केली जनसेवा 

sangita Bhtgunki solapur
sangita Bhtgunki solapur

सोलापूर : कोरनाची साखळी तोडण्यासाठी एप्रिल महिन्यात देशात लॉकडाउन जाहीर झालेला. सर्वत्र बंद असले तरी घरात अन्न शिजवावेच लागणार, अशा काळात घरपोच भाजीपाला मिळणे म्हणजे अन्नपुर्णा प्रसन्नच होणे. कोरोनाच्या काळात स्वतः पिकविले ते स्वतःच विकणार हा निर्धार करून शेतकरी ते ग्राहक अशा थेट विक्रीसाठी पुढाकार घेऊन रोज 500 किलो भाजीपाला विक्री सुरू केला. सध्या शहरात त 7 ठिकाणी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र असून यामुळे 55 लोकांना रोजगार मिळाला आहे. 
मुळात स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या व अधिकारी घडविणारी संगिता लॉकडाउनमध्ये सेंद्रिय शेती फुलवली व 150 शेतकरी गटाच्या माध्यमातून पिकवलेला रसायनविरहित नैसर्गिक शेतमाल संगिता काशिनाथ भतगुणकी या विक्री करत आहेत 

ड्रीम फाउंडेशनतर्फे मागील 10 वर्ष पासून स्पर्धा परीक्षा व कोचिंग क्‍लास मध्ये काशिनाथ व संगिता भतगुणकी यांनी आपला वेगळा ठसा उमठवलेला. कोरोना व लॉकडाउन मध्ये काय करावे हा प्रश्न समोर असतांना मार्च व एप्रिल महिन्यात मास्क तयार करणे,सॅनिटायझर विक्री यात रमली पण सगळीकडे मास्क निर्मिती सुरू झाली व पुढे काय हा नवीन संकट आल्यावर चाणक्‍य गुरुकुल या निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी घेतलेल्या 8 एकर जमिनीत विविध पीक घेण्याचे नियोजन सुरू केली. स्वतः पिकविले ते स्वतःच विकणार यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साठी पुढाकार घेऊन रोज 500 किलो भाजीपाला विक्री सुरू केले त्यातच काही शेतकरी आपला शेतमाल विक्री देण्यास केल्याने सहकार्य केले. अधिकारी घडवणाऱ्या संगीत भतगुणकी यांनी कोरोनाच्या काळात प्रवासाला बंदी असतानाही पास काढून सोलापूरपासून 8 किलोमीटर दूर असलेल्या सोरेगाव या ठिकाणच्या शेतात जावून कष्टान व जिद्दीने सेंद्रिय शेती केली. रसायणविरहित शेतमाल सोलापूरकरांना मिळवूण देण्यासाठी कष्ट उपसले. बसवसंगम नावाने शेतकरी गटाची स्थापना करून सोलापूरकरांना नैसर्गिक भाजीपाला व शेतमाल तर मिळवून दिलाच शिवाय शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठही उपलब्ध करून दिली. 

संगिता यांना लॉकडाउन मध्ये काय करावे, हा प्रश्न समोर असताना मार्च व एप्रिल महिन्यात मास्क तयार करणे, सॅनिटायझर विक्री यात रमली पण सगळीकडे मास्क निर्मिती सुरू झाली व पुढे काय हा नवीन संकट आल्यावर चाणक्‍य गुरुकुल या निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी घेतलेल्या 8 एकर जमिनीत विविध पीक घेण्याचे नियोजन सुरू केले. हत्तरसंगची सून व अक्कलकोट तालुक्‍यातील गौडगाव सुकन्या संगिता यांनी भारती विद्यापीठ समाजकार्य विभागातून एमएसडब्लूचे शिक्षण घेतले. प्राथमिक शिक्षण गौडगाव, हत्तरसंग,यलगुलवार कॉलेज अहिल्याबाई जुनियर आणि वसुंधरा महाविद्यालयात शिक्षण झाले, कायद्याचे शिक्षण घेऊन वकील होण्याची इच्छा असताना शेतीमध्ये रमणारी संगिताचे कार्य जगावेगळी आहे. 

शिक्षण घेऊन घरी बसलेल्या तरुणींनी संगिता भतगुणकी या संदेश देतात की, आपल्या अंगातील सुप्त कला गुणांना वाव देऊन स्वयं रोजगार निर्माण करावा. स्वत:सह इतरांनाही रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com