"अपोलो" द्वारे सोलापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा सुरु 

शाम जोशी
Sunday, 24 January 2021

मूल न झाल्यामुळे निराश असणाऱ्या जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देणारी सेवा येथे मिळणार आहे. अपोलो हेल्थ अँन्ड लाईफ स्टाईल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. चंद्रशेखर यांच्या माध्यमातून
एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्याचे डाॕ.चिडगुपकर यांनी सांगितले

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : वैवाहिक जीवनात अनेक कारणावरुन अपत्यप्राप्तीमधे अडथळे येतात.त्यामुळे अनेकांना नैराश्य येते.या नैराश्यासह अपत्यप्राप्तीतील अडथळ्यांना दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा देणारे अपोलो फर्टिलिटी हॉस्पिटल आता सोलापूरात सुरू झाल्याची माहिती डॉ.मीनल चिडगुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
मूल न झाल्यामुळे निराश असणाऱ्या जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देणारी सेवा येथे मिळणार आहे. अपोलो हेल्थ अँन्ड लाईफ स्टाईल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. चंद्रशेखर यांच्या माध्यमातून
एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा येथे उपलब्ध करुन देण्यात आल्याचे डाॕ.चिडगुपकर यांनी सांगितले. सम्राट चौकातील चिडगुपकर हॉस्पिटलच्या आवारात हे अपोलो हॉस्पिटल सुरू होत आहे. आपोलो ग्रुपचे महाराष्ट्रातील तिसरे केंद्र सोलापूरात सुरु होत आहे. येथे एकाच छताखाली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळणार आहे. अनुभवी डॉक्टर आणि वैद्यकीय अभ्यासक डॉक्टर यांच्या माध्यमातून ही सेवा सोलापूर आणि परिसरातील रुग्णांना मिळणार आहे.
अपोलो हेल्थ अॅड लाईफ स्टाईल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी चंद्रशेखर यांनी सांगितले कि, गेल्या काही वर्षापूर्वी बदलती जीवनशैली, प्रदूषण, झोपेच्या समस्या, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान अशा कारणांमुळे भारतात वंध्यत्वाची समस्या वाढत चालली आहे एका सर्वेक्षणानुसार एकूण लोकसंख्येत 10 ते 14 टक्के लोकांना ही समस्या असून शहरी भागात 10 पैकी तब्बल 6 जोडप्यांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरुष व महिला यांच्या अंतर्गत समस्या सोडवून त्यांना मातृत्व आणि पितृत्वाचा आनंद मिळवून देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल वैद्यकीय उपचार करणार असल्याचे डॉ.चिडगुपकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस डाॕ.ए.सेल्वम, रवी चंदर उपस्थित होते.
-
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apollo launches international standard medical service in Solapur