लालपरीतून निघाली 42 भक्‍तांची अष्टविनायक यात्रा 

विजय थोरात
Saturday, 23 January 2021

सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांना तसेच मंदिरांना जाता यावे, यासाठी महामंडळाने प्रवाशांची मोठी सोय केली आहे. यातून जिल्ह्यात धार्मिक पर्यटन वाढण्यासाठी महामंडळाचा प्रयत्न सुरु आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक प्रवासी पर्यटनासाठी आणि धार्मिकस्थळांना भेटी देण्यासाठी जात असतात. हीच बाब लक्षात घेउन महामंडळाने आणि सोलापूर विभागाने प्रवाशांची सोय केली आहे. महामंडळाला दररोज 22 ते 23 कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने अनलॉकच्या टप्प्यात मालवातूक आणि धार्मिकस्थळांना सर्वांना जाता यावे, यासाठी सहलीचे आयोजन करत आहे. 

सोलापूर: कोरोना महामारीमुळे मागील सहा ते सात महिन्यांपासून एसटीची चाके थांबली होती. मात्र अनलॉकनंतर लालपरीला गती मिळाली. टाळेबंदीत राज्यातील सर्व एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे महामंडळाने यातून बाहेर पडण्यासाठी आणि उत्पन्न वाढीसाठी नवनवे प्रयोग करत आहे. यातूनच आता सोलापूर विभागातील पंढपूर येथून 42 प्रवाशांना घेउन महामंडळाची बस अष्टविनायकला मार्गस्थ झाली. 
सोलापूर जिल्ह्यात अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळांना तसेच मंदिरांना जाता यावे, यासाठी महामंडळाने प्रवाशांची मोठी सोय केली आहे. यातून जिल्ह्यात धार्मिक पर्यटन वाढण्यासाठी महामंडळाचा प्रयत्न सुरु आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील अनेक प्रवासी पर्यटनासाठी आणि धार्मिकस्थळांना भेटी देण्यासाठी जात असतात. हीच बाब लक्षात घेउन महामंडळाने आणि सोलापूर विभागाने प्रवाशांची सोय केली आहे. महामंडळाला दररोज 22 ते 23 कोटींचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने अनलॉकच्या टप्प्यात मालवातूक आणि धार्मिकस्थळांना सर्वांना जाता यावे, यासाठी सहलीचे आयोजन करत आहे. 

30 जानेवारीलाही पुन्हा यात्रा 
महामंडळाने सुरु केलेल्या माल वाहतुकीला सोलापूर विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे यातून सोलापूर विभागाला चांगले उत्पन्न मिळत आहे. येत्या 30 जानेवारी रोजी देखील अष्टविनायक दर्शनासाठी बस आरक्षित असणार आहे. 

सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रवाशांना धार्मिकस्थळे आणि पर्यटनाला जाता यावे, यासाठी सोलापूर विभागातून आजपासून अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्यात आली. एकूण 42 प्रवासी घेउन ही बस अष्टविनायकडे मार्गस्थ झाली. प्रतिसाद पाहून यामध्ये आणखीन वाढ केली जाणार आहे. 
-दत्तात्रय चिकुर्डे, विभाग नियंत्रक, सोलापूर  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashtavinayak Yatra of 42 devotees started from Lalpari