सोलापुरात कोरोना तपासणीसाठी दुसऱ्या प्रयोगशाळाचे अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव

प्रमोद बोडके
Friday, 8 May 2020

सोलापुरातील कोरणाबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाची चाचणी करणारी दुसरी प्रयोग शाळा सोलापुरात सुरू केली जाणार असून या प्रयोगशाळेसाठी कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)  येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. 

सोलापूर : सोलापुरातील कोरणाबाधित व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोनाची चाचणी करणारी दुसरी प्रयोग शाळा सोलापुरात सुरू केली जाणार असून या प्रयोगशाळेसाठी कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर)  येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुणे महसूल विभागाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी सोलापुरात सुरू होणाऱ्या दुसऱ्या प्रयोगशाळेची माहिती घेतली. याबाबतचा  प्रस्ताव तातडीने सादर करून ही प्रयोगशाळा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी महाविद्यालय व जिल्हा प्रशासनाला दिल्या  आहेत. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी करणारी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यात आली आहे. उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यासाठी असलेल्या या प्रयोगशाळेत कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारांचे निदान केले जात आहे. दिवसाला कमीतकमी 125 रिपोर्ट तपासण्याची क्षमता शासकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत आहे. याशिवाय सोलापुरातील 2 टीबी सेंटरमध्ये कोरोनाचे स्क्रीनिंग करण्याचीही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. येत्या काही दिवसात सोलापूरमध्ये कोरोना चाचणीची दुसरी प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. 

प्रशासनाकडून पाठपुरावा
सोलापुरात कोरोना चाचणीची दुसरी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाने प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला असून ही कार्यशाळा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पाठपुरावा केला जात आहे. 
- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

महावियद्यालयाची स्थिती...
कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात सध्या एमबीबीएस या पदवी अभ्यासक्रमास  अनुसरुन आवश्यक असलेली यंत्रसामग्री उपलब्ध आहे. याठिकाणी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम नसल्याने कोरोना चाचणी प्रयोगशाळेसाठी आवश्यक असलेली पीसीआर सह इतर यंत्रसामग्री सध्या उपलब्ध नाही. कोरोना चाचणीची प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी महाविद्यालय इच्छुक असून आम्ही याबाबतचा प्रस्ताव पुण्यातील आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला प्रस्ताव दिला आहे. कुंभारी येथील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन वॉर्ड तयार केला असून शंभर बेडची व्यवस्था आहे. सध्या या ठिकाणी 28 कोरोना बाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.  महाविद्यालय व रुग्णालयात काम करणारे कुंभारी व परिसरातील कर्मचारी/कामगार कामावर येण्यासाठी तयार होत नाहीत. या कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासन व महाविद्यालयाच्यावतीने संपूर्ण सुरक्षा पुरविली जात आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत ग्रामस्थ व परिसरातील कर्मचाऱ्यांनी आपले योगदान द्यावे. 
- डॉ. माधवी रायते, अधिष्ठाता, अश्विनी ग्रामीण महाविद्यालय, कुंभारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwini Medical College proposal for laboratory for corona testing in Solapur