सांगोला तालुक्‍यात पोलिसांना धक्काबुक्की करून वाळू चोरी करणारी वाहने पळविण्याचा प्रयत्न 

Attempt to hijack sand stealing vehicles by pushing police in Sangola taluka
Attempt to hijack sand stealing vehicles by pushing police in Sangola taluka

सांगोला (जि. सोलापूर) : वाळू वाहतूक करताना पकडलेले तीन ट्रॅक्‍टर व एक जेसीबी पोलिस स्थानकात आणत असताना पोलिसांना धक्काबुक्की करून ही वाहने पळवून नेण्याचा प्रयत्न सोमवारी (ता. 25) मध्यरात्री चिंचोली (ता. सांगोला) येथे करण्यात आला. याबाबत नऊ जणांविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल केला असून 20 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत हस्तगत केला आहे. 
चिंचोली हद्दीतील मानेवस्ती लगत असलेल्या ओढ्यातून जेसीबी व ट्रॅक्‍टरच्या मदतीने वाळू चोरी होत असल्याची गोपनीय खबर पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळाली होती. या ठिकाणी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाऊन पाहणी केली असता मानेवस्ती लगत असलेल्या ओढ्यातून तीन ट्रॅक्‍टर व एका जेसीबीच्या साहाय्याने वाळू चोरी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांना गराडा घालून पकडण्याचा प्रयत्न केला असता पोलिस आल्याची वाळू माफियांना चाहूल लागल्याने त्यातील तीन ट्रॅक्‍टर माने वस्तीच्या दिशेने कच्च्या रस्त्याने जाऊ लागले व जेसीबी ओढ्यातून जाऊ लागला, पोलिसांनी या वाहनांचा पाठलाग केला असता मानेवस्तीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या एका ड्रायव्हरने ट्रॅक्‍टर चालू स्थितीत सोडून पळ काढला. हा ट्रॅक्‍टर अचानक येथील एका घराच्या भिंतीवर चढल्याने जागीच अडकला, तर पाठीमागील दोन ट्रॅक्‍टर बंद करून दोन्ही ड्रायव्हर पसार झाले. पोलिसांनी या वाहनांची पाहणी केली असता भिंतीवर चढलेल्या ट्रॅक्‍टरला नंबर नव्हता. तर एम. एच. 24 डी. 6328 व दुसरा एक बिगरनंबरचा निळ्या रंगाचा ट्रॅक्‍टर असे दोन ट्रॅक्‍टर रस्त्यावर उभा होते. तिन्ही ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीमध्ये प्रत्येकी एक ब्रास बाळू व एम. एच. 45 एफ. 9813 क्रमांकाचा जेसीबी असा एकूण अंदाजे 20 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत हस्तगत केला. यावेळी ही वाहने पोलिस स्थानकात नेत असताना शिवाजी संदीपान बेहरे व धनाजी काकासाहेब बेहरे हे दोघे आपल्या एम. एच. 45 एक्‍स. 9410 क्रमांकाच्या दुचाकीवरून आले आणि त्यांनी दुचाकी ट्रॅक्‍टरला आडवी लावून तुम्हाला ही वाहने घेऊन जाऊ देणार नाही, असे म्हणून पोलिसांना हुज्जत घालण्यास आणि धक्काबुक्की करण्यास सुरवात केली आणि ट्रॅक्‍टरमधील वाळू रस्त्यावर सांडण्यास सुरवात केली. याप्रकरणी सात जणांवर सांगोला पोलिसात वाळू चोरी व शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com