पारव्यांना संसर्ग; 'एव्हिन पॉक्‍स'ची बाधा, जखमी आवस्थेत आढळण्याच्या प्रमाणात वाढ

Avin pox is found in pigeons in Solapur district.jpg
Avin pox is found in pigeons in Solapur district.jpg

सोलापूर : शहर व जिल्ह्यात वावर असलेल्या पारवा पक्ष्यांमध्ये ऐव्हीन पॉक्‍स या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव आढळल्याने अनेक पक्षी मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. याचा माणसांना कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा पशुवैद्यकीय अधिकारी पक्षीप्रेमींनी दिला आहे. अनेक पक्ष्यांनाही विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होत आहे.

सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
वन्यजीव प्रेमींना 20 दिवसांपासून सतत पारवा पक्षी जखमी अवस्थेत आढळत असल्याचे फोन येत आहेत. यामुळे त्यांनी पक्षी निरीक्षण करताना पाहणी केली असता, पारवा पक्षी जखमी अवस्थेत नव्हे, तर त्यांना कोणता तरी आजार असल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता 'एव्हिन पॉक्‍स'ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. ऍनिमल राहतच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्यांनाही एव्हिन पॉक्‍स आजाराचे लक्षणे असल्याचे आढळले. हा आजार पारवा, कबुतर, साळुंखी, लव बर्ड, पोपट या पक्ष्यांमध्ये आढळतो. यामध्ये आढळून आलेल्या सर्व प्रकार हे सध्या पारवा पक्ष्यांमध्येच आहेत. हा आजार वेगाने पसरत असल्याचेही समोर येत आहे.

ऐव्हिन पॉक्‍स हा पक्ष्यांमधील जुना आणि संसर्गजन्य रोग असून याची उत्पत्ती ही पॉक्‍स व्हिरिडी कुटुंबातील आहे. हा विषाणूजन्य रोग असून सर्वसामान्यपणे काही पक्ष्यांना याचा संसर्ग दिसून येतो. याचा प्रसार पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातीमध्ये होत असून प्रत्येक पक्ष्यांत त्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. पक्ष्यांच्या स्वतःच्या प्रतिकारक्षमतेवर या आजाराची लक्षणे दिसून येतात. या विषाणूजन्य आजारावर सध्या या आजारावर कोणतेही रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे लाक्षणिक उपचार (सिम्प्टमॅटिक ट्रिटमेंट) करावे लागतात. तसेच या पक्ष्यांना मल्टिव्हिटॅमिन व इतर औषधे लक्षणे पाहून दिली जातात. या आजाराचा इनक्‍युबेशन पिरेड हा आठ दिवसाचा आहे. 

एव्हिन पॉक्‍सची लक्षणे 

- पक्ष्यांचे चोच, पाय, तोंडावर सुरूवातीच्या काळात पांढरा किंवा पिवळ्या रंगाच्या पुरळीसारखे बारिक फोड येणे 
- लवकरच पुरळांची वाढ होऊन ते टणक होत जातात 
- काही पक्ष्यांच्या तोंडात श्‍वसन मार्गात घट्ट स्राव तयार होतो 
- या स्त्रावांमुळे अन्न व पाणी घेण्यास अडचण येऊन ते कमजोर बनतात व त्यात त्यांचा मृत्यू होतो 

पारवा जखमी झाल्याच्या 20 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. पाहणी केली असता हे पक्षी जखमी नसून आजाराने बाधित झाल्याचे दिसून आले आहेत. 
- मुकुंद शेटे, अध्यक्ष, वन्यजीवप्रेमी संघटना, सोलापूर 

या आजाराचा मानव समूहाला कोणताही धोका नाही. परंतु अशा संसर्गजन्य पक्ष्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्याची हाताळणी सुरक्षित करावी. 
- डॉ. आकाश जाधव, ऍनिमल राहत, सोलापूर 

पारवा, कबुतरातील फरक 

- पारवा म्हणजे रॉक पिजन म्हणून ओळखला जातो 
- पारव्याचे शास्त्रीय नाव कोलंबिया लिव्हिया असे आहे 
- कबुतराचे शास्त्रीय नाव कोलंबिया लिव्हिया डोमेस्टिका असे आहे 
- इमारतीच्या ठिकाणी प्रामुख्याने पारवे आढळतात 
- पाळण्यासाठी कबुतरांचा उपयोग होतो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com