esakal | भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे व्हावे जतन 

बोलून बातमी शोधा

dr babasaheb ambedkar.jpg}

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणांचे जतन करावे, यासाठी चंदनशिवे यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी (ता. 10) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या पुढाकारातून बैठकही घेतली. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मोडनिंब येथे भेटून निवेदन दिले. यावेळी या ठिकाणांचे सुशोभिकरण व स्मारक करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ व समाजकल्याण विभागाकडील सामाजिक वारसा पुढे ठेवाअंतर्गत आणि जिल्हा परिषदेकडील विशेष तरतुदीसाठीचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे व्हावे जतन 
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते एका विहिरीचे उद्‌घाटन झाले होते. तर कुंभारी येथील बाबासाहेबांनी भेट दिलेल्या पंचाची चावडीचा परिसर आणि माता रमाई यांच्या आजारपणात सहवास लाभलेल्या माढा तालुक्‍यातील बावी या ठिकाणांचे सुशोभिकरण करुन त्याठिकाणी स्मारक उभारावेत, अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांकडे केली. 
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठिकाणांचे जतन करावे, यासाठी चंदनशिवे यांनी पुढाकार घेतला आहे. बुधवारी (ता. 10) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या पुढाकारातून बैठकही घेतली. त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना मोडनिंब येथे भेटून निवेदन दिले. यावेळी या ठिकाणांचे सुशोभिकरण व स्मारक करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ व समाजकल्याण विभागाकडील सामाजिक वारसा पुढे ठेवाअंतर्गत आणि जिल्हा परिषदेकडील विशेष तरतुदीसाठीचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा प्रशासनाधिकारी पंकज जावळे, मंडई व उद्यान विभागाचे सभापती गणेश पुजारी, श्रीमंत जाधव, लक्ष्मण कसबे, महादेव गावडे, कुंदन बनसोडे, विजय परबत, गौतम ओहोळ, सिद्धार्थ शेंडगे, संजीव शिंदे, संतोष कसबे, चंद्रकांत ओहोळ, सतीश ओहोळ, धीरज नाईक आदी उपस्थित होते. 

'असे' आहे त्याठिकाणांचे महत्त्व... 
वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील भीमनगरमध्ये राहणाऱ्या समाजबांधवांनी विहीर बांधण्याचा निर्णय घेतला. त्या विहिरीच्या उद्‌घाटनासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आले होते. 1937 मध्ये बाबसाहेबांनी रेशिमच्या दोरीने चांदीचा ग्लास बांधून विहिरीतले पाणी काढले आणि हा उद्‌घाटन सोहळा संपन्न झाला. विहीर परिसराची जागा, गावातील गावठाण आरक्षित क्षेत्र असून त्या जागेचा वापर भीमनगरमधील रहिवास करतात. तसेच त्याचदिवशी बाबासाहेब कुंभारी येथील समाज बांधवांकडून बांधण्यात आलेल्या पंचाच्या चावडीस भेट दिली. त्यावेळी त्यांचा त्याठिकाणी सत्कार करण्यात आला होता. दुसरीकडे माता रमाई यांच्या आजारपणात त्या विश्रांतीसाठी दोन महिने माढा तालुक्‍यातील बावी येथे मुक्‍कामी होत्या, असे महत्त्व चंदनशिवे यांनी पालकमंत्र्यांनी सांगितले.