सकाळ ब्रेकिंग !...तर आता बॅंक व्यवस्थापक थेट तुरुंगात 

IMG-20200413-WA0128.jpg
IMG-20200413-WA0128.jpg
Updated on

सोलापूर : खातेदारांना जीवनाश्‍यक वस्तू खरेदीसाठी पैसे मिळावेत म्हणून बॅंका सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवल्या आहेत. दरम्यान, लॉकडाउन काळात संबंधित आस्थापनांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मात्र, बॅंकांबाहेरील लोकांची गर्दी कमी झालेली नसून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे गृह मंत्राल्याच्या आदेशानुसार अशा बॅंक व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी दिला. 

खातेदारांना बॅंकेतून पैसे काढण्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वेळ दिली आहे. खातेदारांनी सोशल डिस्टन्स पाळावा यासाठी बॅंकांनी पांढरे पट्टे तयार केले आहेत. मात्र, त्याचा उपयोग होतच नसल्याने कोरोनाचा धोका वाढू लागला आहे. सोलापुरात कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून त्याचा संपर्क अनेकांशी आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी काळात गर्दीतून कोरोना या विषाणूचा संसर्ग वाढण्याची भिती वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच बॅंकांनी खबरदारी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग आणि घराबाहेर न पडणे, हेच कोरोनाला हद्दपार करण्याचे ठोस उपाय आहेत. केंद्र सरकारने संबंधित आस्थापनांना त्यासंदर्भात निर्देश दिले असून त्याचे बॅंकांनी तंतोतंत पालन करायलाच हवे, असे आवाहनही पोलिस आयुक्‍त शिंदे यांनी केले. 

सूचना देऊनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही 
केंद्र सरकारने सोशल डिस्टन्सिंगबाबत संबंधित आस्थापनांना दिलेल्या निर्देशाचे पालन बॅंकांनी करावे, अशा वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही बॅंकांकडून गर्दी कमी करणे अथवा सोशल डिस्टन्सचे पालन करण्यासंदर्भात ठोस उपाय केल्याचे दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार संबंधित बॅंकेच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. 
- अंकूश शिंदे, पोलिस आयुक्‍त, सोलापूर 

बॅंकांना सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीचे निर्देश 
शहर-जिल्ह्यातील बॅंक मित्रांच्या माध्यमातून खातेदारांना पैसे देण्याची व्यवस्था करुनही खातेदार बॅंकांबाहेर गर्दी करीत आहेत. बॅंकांबाहेर खातेदारांची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व व्यवस्थापकांना दिल्या आहेत. सुरक्षा रक्षक नियुक्‍त करण्यास अडचणी असल्याचे बॅंकांकडून सांगण्यात येत असून गर्दी कमी व्हावी यादृष्टीने बॅंकांनी कंत्राटी कर्मचारी नियुक्‍त केले आहेत. 
- संतोष सोनवणे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur VIP Darshan ban during Ashadhi Wari
mantralay
Punyashlok Ahilyadevi Holakar univercity, solapur
उजनी धरण
Marathi News Esakal
www.esakal.com