बार्शी तालुक्‍यात 672 अहवालात आढळले 50 पॉझिटिव्ह 

प्रशांत काळे 
Friday, 28 August 2020

बार्शी तालुक्‍यात आत्तापर्यंत 1 हजार 626 जण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शहरातील 975 तर ग्रामीणभागातील 651 जण आहेत. 126 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यातील शुक्रवारी प्राप्त झालेल्या 672 तपासणी अहवालामध्ये 50 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. कोरोनामुळे एक जणाचा मृत्यू झाला आहे. शहरातील 517 तर ग्रामीणमधील 126 असे 622 जण निगेटिव्ह आले असून कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 988 झाली आहे, अशी माहिती तहसीलदार डी.बी.कुंभार यांनी दिली. 
बार्शी शहरातील 546 व ग्रामीणमधील 126 असे 672 अहवाल प्राप्त झाले. यामध्ये शहरातील 29 व ग्रामीणमधील 21 असे 50 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. शहरातील 44 व ग्रामीणमधील 45 अशा 89 जणांचा आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ग्रामीणमधील एकाचा मृत्यू झाला. शहरात 1 हजार 190 तर ग्रामीणमध्ये 798 असे एकूण 1 हजार 988 जण कोरोनाबाधित आहेत. शुक्रवारी शहरातील नागणे प्लॉट, दत्तनगर, मंगळवार पेठ, शिवाजी नगर, जावळी प्लॉट, तुळशीराम रोड, सोमवार पेठ, कापड गल्ली, गुळओळ रस्ता येथे प्रत्येकी एक जण तर कसबा पेठ तीन, नाळे प्लॉट चार, कुर्डुवाडी रोड सात, गाडेगाव रोड दोन, बालाजी कॉलनी दोन, अलिपूर रोड दोन असे 29 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागातील वैराग दोन, बावी (आ) एक, देवगाव तीन, उपळेदुमाला पाच, बोरगाव तीन, पानगाव दोन, काळेगाव दोन, गौडगाव, अरणगाव, चुंब येथे प्रत्येकी एक जण असे 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 
तालुक्‍यात आत्तापर्यंत 1 हजार 626 जण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये शहरातील 975 तर ग्रामीणभागातील 651 जण आहेत. 126 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. शहरातीत 59 तर ग्रामीण भागातील 69 असे 127 जणांना गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कुंभार यांनी दिली. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Barshi taluka 672 reports found 50 corona positive