बार्शी तालुक्‍यात 83 कोरोनाबाधित रुग्णांची भर; दोघांचा मृत्यू 

प्रशांत काळे
Wednesday, 16 September 2020

बार्शी शहरातील 68 तर ग्रामीणमधील 60 अशा 128 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 89 तर ग्रामीणमध्ये 58 अशा 147 जणांवर उपचार सुरु आहेत. शहरात 2 हजार 214 तर ग्रामीण भागात 1 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर व तालुक्‍यात बुधवारी प्राप्त झालेल्या 302 तपासणी अहवालामध्ये 83 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यात शहरातील 41 तर ग्रामीणमधील 42 असे रुग्ण असून बाधितांची संख्या 3 हजार 626 झाली आहे. कोरोनामुक्त होऊन 2 हजार 560 जण घरी गेले आहेत. 128 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली. 
शहरातील 192 व ग्रामीणमधील 110 असे 302 अहवाल प्राप्त झाले आहे. शहरातील 382 व ग्रामीणमधील 84 असे 466 जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरातील 68 तर ग्रामीणमधील 60 अशा 128 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील 89 तर ग्रामीणमध्ये 58 अशा 147 जणांवर उपचार सुरु आहेत. शहरात 2 हजार 214 तर ग्रामीण भागात 1 हजार 412 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 
आज शहरातील शिवाजीनगर 8, अलिपूर रोड 5, सोलापूर रोड, उपळाई रोड, फुले प्लॉट, पाटील प्लॉट येथे प्रत्येकी दोन, दत्तनगर, पवार प्लॉट, कसबा पेठ, मांगडे चाळ, मिरगणे कॉम्प्लेक्‍स, कापसे बोळ, नाईकवाडी प्लॉट, देशमुख प्लॉट, उपळाई रोड, ग्रामीण रुग्णालय, धर्माधिकारी प्लॉट, ढगे मळा, भोगेश्वरी चाळ, कासारवाडी रोड, चव्हाण प्लॉट, पिंपरकर प्लॉट, सनगर गल्ली, भिसे प्लॉट येथे प्रत्येकी एक असे 41 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. ग्रामीण भागातील पांगरी आठ, ताडसौंदणे पाच, पानगाव चार, शेळगाव, खांडवी प्रत्येकी 3 झाडी, मांडेगाव, नागोबाचीवाडी, मालवंडी येथे प्रत्येकी दोन, रऊळगाव, उपळाई ठोंगे, चुंब, धसपिंपळगाव, गुळपोळी, हिंगणी, उपळेदुमाला, रातंजन, सौंदरे येथे प्रत्येकी एक जण असे 42 जण बाधित आढळले. पाच जणांचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती दगडे-पाटील यांनी दिली. 

संपादन : वैभव गाढवे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Barshi taluka 83 corona infected patients