दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने बीज भांडवल योजना राबवली जाते. त्यामध्ये समाजकल्याण खाते व राष्ट्रीयकृत बॅंका एकत्र येऊन दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज देउन व्यवसाय सुरू करण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देतात. समाजकल्याण खात्याकडून या कर्जावर वीस टक्के सबसिडी दिली जात आहे. यासोबतच दिव्यांग-अव्यंग विवाह योजना राबवली जाते. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीशी सामान्य व्यक्तीचा विवाह झाल्यास अशा दाम्पत्याला पन्नास हजार रुपयाची मदत केली जाते.
सोलापूरः जिल्ह्यात आतापर्यंत 29 हजार दिव्यांगाची नोंदणी झाली आहे. या दिव्यांगांना योजना सोबत कौशल्यावर आधारित शिक्षणाचे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रभावीपणे या योजना राबवल्या जात आहेत. मदतीबरोबरच त्यांना कौशल्य शिक्षण मिळत असल्याने ते व्यवसायाच्या प्रवाहात येत आहेत.
अस्थिव्यंग, दृष्टीबाधित, मूकबधिर आणि मतिमंद या चार प्रकारातील अपंगत्त्व असलेल्या नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात.
हेही वाचाः पत्नीच्या निधनानंतर कामगाराने तिन्ही मुलांना बनवले इंजिनीअर
दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने बीज भांडवल योजना राबवली जाते. त्यामध्ये समाजकल्याण खाते व राष्ट्रीयकृत बॅंका एकत्र येऊन दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज देउन व्यवसाय सुरू करण्यासाठी रक्कम उपलब्ध करून देतात. समाजकल्याण खात्याकडून या कर्जावर वीस टक्के सबसिडी दिली जात आहे. यासोबतच दिव्यांग-अव्यंग विवाह योजना राबवली जाते. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तीशी सामान्य व्यक्तीचा विवाह झाल्यास अशा दाम्पत्याला पन्नास हजार रुपयाची मदत केली जाते.
हेही वाचाः सोलापूर जिल्ह्यातील 94 टक्के मिळकतपत्रिका झाल्या ऑनलाईन
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. शंभर रुपये प्रतिमहिना याप्रमाणे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाते. जिल्हा परिषदेच्या सेस फंड व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करण्याची योजना आहे. 40 हजार रुपये लाभार्थ्याला स्टॉल खरेदीसाठी दिली जाते.
दृष्टीबाधितासाठी नॅबच्या माध्यमातून मदत केली जाते. तसेच अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना शाळास्तरावर कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शिकवले जातात. या विद्यार्थ्यांना संगणक, मोबाईल रिपेरिंग असे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी स्वावलंबी होत आहेत.
ठळक बाबी
- 874 दिव्यांगाना 33 लाख 77 हजार रुपयांचे कृत्रिम अवयव, साहित्य वाटप
- 720 विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे वितरण
- बीज भांडवल योजनेतून 7 लाख 58 हजार रुपयांचे अनुदान वाटप
दिव्यांग सर्वेक्षणाची कामे सुरू
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना व दिव्यांग सर्वेक्षणाची कामे सुरू आहेत. त्याचा थेट लाभ दिव्यांगाना मिळवून दिला जातो.
-सच्चिदानंद बांगर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, समाजकल्याण विभाग
कौशल्यावर आधारित प्रशिक्षण
अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना मागील काही वर्षापासून कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. त्याचा लाभ आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना झाला व ते स्वावंलबी जीवन जगत आहेत.
-समीर तडवळकर, रमाबाई अपंग प्रशिक्षण केंद्र, सोलापूर