कुटुंबाला सावरत जगण्याची लढाई शकुंतला शटगुंडे यांचे शिलाई मशिनवर काम 

shakuntala.
shakuntala.
Updated on

सोलापूर : पतीचे निधन होऊन पाच-सहा वर्षे झाली. त्यातच मोठ्या मुलाला हृदयाचा आजार. त्याचीही डॉक्‍टरांनी गॅरंटी दिलेली नाही. कोणाचाही आधार नाही. अशा बिकट परिस्थितीत शिलाई मशिनवर काम करून आपले इवलेसे कुटुंब चालवते. लॉकडाउनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या संकटात त्या आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. शिलाई मशिनवर काम करून आपल्या कुटुंबाला जगविण्याची लढाई लढत आहेत शकुंतला शटगुंडे. 
सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देश लॉकडाउन आहे. लोक उपाशीपोटी झोपत आहेत. कित्येकांच्या घरात चुली पेटत नाहीत. अशा परिस्थितीमध्येही त्यांनी हिंमत न हरता, न डगमगत घराचा आणि दोन मुलांचा सांभाळ केला आहे. 

शकुंतला यांच्या पतीचे निधन होऊन पाच वर्षे झाली. त्यांचा प्रेमविवाह होता. पती उच्चशिक्षित होते. ते पुण्यामध्ये चांगल्या पगारावर काम करत होते. घराला आर्थिक पाठबळ द्यावे, या हेतूने त्यांनी शिलाई मशिनचे प्रशिक्षण घेतले; परंतु पुण्यातील घरात चोरी झाली आणि सर्वच संपले. नंतर ते सोलापूरमध्ये आले. पण त्यांच्या पतीला चांगल्या पगाराची नोकरी भेटली नाही. याचदरम्यान त्यांना दोन अपत्ये झाली. मोठ्या मुलाला हृदयाचा आजार आहे, असे डॉक्‍टरांनी सांगितले. खूप उपचार केले, पैसेसुद्धा खर्च झाले. पुणे, मुंबई, बंगळूर अशा मोठ्या शहरांत त्याचा इलाज केला. परंतु, कुठेच त्याचे निदान झाले नाही. 

या सर्व धक्‍क्‍याने त्यांच्या पतीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्या एकट्या पडल्या. परंतु, त्यांनी हिंमत हरली नाही. या आधी दुर्दैवाने त्यांच्या सासू, सासऱ्यांचे निधन झाले होते. त्या एकाकी झाल्या, घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, त्यात मुलाचे आजारपण या सर्व गोष्टींचा सामना त्या मोठ्या हिमतीने करत आहेत. उदरनिर्वाहासाठी त्या शिलाई मशिनवर छोटे-मोठे शिवणकाम करतात, त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 
परंतु, सध्या कोरोनामुळे सर्वकाही बंद असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कित्येक कष्ट करून जगणाऱ्या महिलांवर आज अडचणीची वेळ आली आहे. काम करायची तयारी आहे; परंतु सर्वच बंद असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. अशा कष्ट करून जगणाऱ्या महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. 


"प्रार्थना'चा मदतीचा हात 
लॉकडाउनमध्ये अनेक दिवसांपासून गरजूंपर्यंत अन्नधान्याचे किट पोचवण्याचे काम प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. संस्थेच्या माध्यमातून अत्यंत गरजू कुटुंबांना अर्थात ज्यांची चूलच बंद पडली आहे, ज्यांना एक वेळेच जेवणही भेटत नाही अशा कुटुंबांना मदत करण्याचे काम केले जाते. त्यांच्या बंद पडलेल्या चुली पुन्हा पेटवण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. शकुंतला शटगुंडे यांनाही प्रार्थना फाउंडेशनने मदतीचा हात पुढे करत एक महिन्याचे किराणा साहित्य भरून दिले आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com