बीबी दारफळ, कर्देहळ्ळीत सापडले नव्याने कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जून 2020

तालुकानिहाय बाधितांची संख्या 
अक्कलकोट-40, बार्शी-30, करमाळा-1, माढा-7, माळशिरस-5, मंगळवेढा-0, मोहोळ-13, उत्तर सोलापूर-15, पंढरपूर-7, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-94, एकूण-215. 

सोलापूर ः जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये एकूण 11 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) व कर्देहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) या नव्या ठिकाणच्या कोरोनाबाधितांचा समावेश आहे. दररोज नवीन गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडू लागल्याने ग्रामीण भागातही चिंता व्यक्त केली जात आहे. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण 95 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 84 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्या 11 जणांमध्ये पाकमी (ता. उत्तर सोलापूर) येथील एक स्त्री, बीबी दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील एक पुरुष, बुधवारपेठ अक्कलकोट येथील एक स्त्री एक पुरुष, मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील एक स्त्री, बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील एक स्त्री, कर्देहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील एक स्त्री एक पुरुष, क्रांतीनगर मोहोळ येथील दोन स्त्रिया, वाळूज (ता. मोहोळ) येथील एक पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बाधितांची संख्या आता 215 इतकी झाली आहे. त्यामध्ये 132 पुरुष व 83 स्त्रियांचा समावेश आहे. अद्यापही 115 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 89 एवढी आहे. अद्यापही 35 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. ग्रामीण भागात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BB Darfal, Kardehalli found newly corona patient