महाशिवरात्री निमित्ताने विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोषाख आणि डोक्यावर सोनेरी टोप असा पोशाख परिधान करण्यात आला आहे. शहरातील इतर शिव मंदिरात ही पहाटे पासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
पंढरपूर (सोलापूर) : महाशिवरात्रीनिमित्त येथील विठ्ठल मंदिरात बेलीच्या पानांची सजावट करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्ताने शुक्रवारी (ता. २१) आज पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बेलीच्या पानांची आकर्षक अशी सजावट केली आहे.
आज पहाटे पासूनच भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे.
विठ्ठलाच्या गाभार्यात बेलीच्या पानांची आणि विविध फुलांची आरास केली आहे. गाभारा,
प्रवेश द्वार, सभामंडप, सोळखांबी यास ह मंदिरात पानांची आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
महाशिवरात्री निमित्ताने विठ्ठलाला पांढरा शुभ्र पोषाख आणि डोक्यावर सोनेरी टोप असा पोशाख परिधान करण्यात आला आहे. शहरातील इतर शिव मंदिरात ही पहाटे पासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.