शिवसेना वाढीसाठी आमदार डॉ. तानाजी सावंत यांना सक्रीय करावे

अण्णा काळे 
Sunday, 17 January 2021

या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शिवसेनेतील आलेली मरगळ दूर करण्यासाठी शिवसेना पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांना पुन्हा पक्ष वाढीसाठी अधिक सक्रिय करावे.

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यात शिवसेना पक्ष वाढीसाठी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांना सक्रीय करावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे व शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड यांनी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शिवसेनेतील आलेली मरगळ दूर करण्यासाठी शिवसेना पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत यांना पुन्हा पक्ष वाढीसाठी अधिक सक्रिय करावे.

हे ही वाचा : करमाळ्यात विजयावर पैजा ! कोणता गट किती पाण्यात, यावरच मतदानापासून खुमासदार चर्चा

करमाळा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तत्कालीन विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांना तिकीट न देता पक्षाने रश्मीदिदी बागल यांना शिवसेनेचे विधानसभेचे तिकीट दिल्यामुळे शिवसेनेत ऐन विधानसभा निवडणुकीत दोन गट निर्माण झाले त्याचा परिणाम निवडणूक निकालावर झाला. आता जुन्या व नव्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन दोन्ही गटातील शिवसेना कार्यकर्ते यांना आपसातील मतभेद बाजूला ठेवून शिवसेना हाच माझा गट व पक्ष या माध्यमातून एकत्र आणून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी आमदार तानाजीराव सावंत यांना जिल्हासंपर्कप्रमुखपदी सक्रिय करावे, अशी करमाळा शहर तालुक्यातील शिवसेना, युवासेना महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे .

.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Avtade said that MLA Dr. Shiv Sena for growthTanaji Sawant should be activated