ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ! 'या' तालुक्‍यातून दोन कोटींचा मुद्देमाल जप्त 

तात्या लांडगे
Wednesday, 16 September 2020

ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याच्या हेतूने पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या पथकाने 1 ते 15 सप्टेंबर या काळात सांगोल्यातील कोळा गावातील अवैध वाळू उपशावर कारवाई (ता. 2) करुन तीन मशिन, दोन ट्रक, एक टिपर आणि तीन ट्रॅक्‍टर जप्त केले.

सोलापूर : वाळू चोरी, जुगार व अवैध मटका व्यवसायावर कारवाई करीत ग्रामीण पोलिस दलातील विशेष पथकाने 15 दिवसांत दोन कोटी नऊ लाख 67 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सांगोला, पंढरपूर, टेंभूर्णी, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर या तालुक्‍यांत करण्यात आल्याची माहिती विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक विनय बहिर यांनी दिली. 

 

ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याच्या हेतूने पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या पथकाने 1 ते 15 सप्टेंबर या काळात सांगोल्यातील कोळा गावातील अवैध वाळू उपशावर कारवाई (ता. 2) करुन तीन मशिन, दोन ट्रक, एक टिपर आणि तीन ट्रॅक्‍टर जप्त केले. दहा जणांना पकडून त्यांच्या ताब्यातील एक कोटी 39 लाख 98 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर 5 स्पटेंबरला अकलूज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संगम पुलाजवळ भिमा नदीच्या पात्रातून सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई केली. त्याठिकाणाहून पोलिसांनी पाच वाहनांसह 36 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 7 सप्टेंबरला मंगळवेढा पोलिस ठाण्याच्य हद्दीत सांगोला रोडवर राजकिरण हॉटेलमागे जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणाहून चार वाहनांसह 17 जणांना ताब्यात घेतले. दोन लाख 85 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 11 सप्टेंबरला अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहाजण, एक वाहनासह 73 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. हैद्रा येथेही शेतात जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करीत तिथून पोलिसांनी 11 लाख 38 हजार 40 रुपयांचा, तर पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इसबावी येथे अवैध वाळू उपशावर कारवाई करुन पाच वाहनांसह 18 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विनय बहीर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस शिपाई कल्याण भोईटे, मनोज राठोड, रणजित मदने, शैलेश जाधव, दत्तात्रय झिरपे, लक्ष्मण हेमाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Big action of solapur rural police Property worth Rs 2 crore confiscated