esakal | मराठी- उर्दू भाषांतरात करिअरच्या मोठ्या संधी : ज्येष्ठ भाषांतरकार मोईनोद्दीन उस्मानी यांचे मत

बोलून बातमी शोधा

khadimane urdu foram.jpg}

खादिमाने उर्दू फोरमच्या वतीने मराठी- उर्दू भाषांतर  राज्यस्तरीय  कार्यशाळेचे आयोजन केले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ उर्दू विभाग व खादिमाने उर्दू फोरम यांच्या संयुक्तरित्या आयोजित मराठी- उर्दू भाषांतर कार्यशाळेचे चौथे पुष्प ज्येष्ठ अनुवादक मोईनोद्दीन उस्मानी (जळगांव) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

मराठी- उर्दू भाषांतरात करिअरच्या मोठ्या संधी : ज्येष्ठ भाषांतरकार मोईनोद्दीन उस्मानी यांचे मत
sakal_logo
By
प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः मराठी-उर्दू भाषांतरासाठी नव्या पिढीला फार मोठी करिअरची संधी आहे. या संधीचा उपयोग करून उत्तमोत्तम साहित्य दोन्ही भाषिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करण्याची मोठी गरज असल्याचे मत ज्येष्ठ लेखक व भाषांतरकार मोईनोद्दीन उस्मानी (जळगाव) यांनी व्यक्त केले. 
खादिमाने उर्दू फोरमच्या वतीने मराठी- उर्दू भाषांतर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ उर्दू विभाग व खादिमाने उर्दू फोरम यांच्या संयुक्तरित्या आयोजित मराठी- उर्दू भाषांतर कार्यशाळेचे चौथे पुष्प ज्येष्ठ अनुवादक मोईनोद्दीन उस्मानी (जळगांव) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
ते पुढे म्हणाले, प्रत्येक भाषेचे एक वैशिष्ट्य असते. अनुवादकाला दोन्ही भाषेच्या शैलीचा, संस्कृतीचा व लिपीचा खोल अभ्यास असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात मराठी-उर्दू अनुवादाचे मोठे कार्य झाले आहे. पण आणखी यात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. ज्यांनी भाषांतरात लौकिक प्राप्त केले त्यामध्ये बदिउज्जमा खल्विर, मैमुना दळवी, अ.सत्तार दळवी, डॉ. याह्या नशीन, युनूस अगासकर, खालिद आगसकर, राम पंडित, कासिम नदीम, सलामबिन रजाक, डॉ. असदुल्लाह व संगीता जोशी यांचे नाव अग्रेसर आहेत. 
खादिमाने उर्दू फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी सांगितले की, मराठी व उर्दूमध्ये जवळीक निर्माण व्हावी व नवीन अनुवादक शोधण्यास मदत मिळावी हा प्रयत्न आहे. गेल्या सहा वर्षापासून फोरम मराठी व उर्दूच्या संवर्धनासाठी व अनुवादासाठी स्पर्धा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांमध्ये अनुवादाबद्दल रूची निर्माण व्हावी. अनुवाद कार्याला करिअर म्हणून निवडावे. या कार्यशाळेत राज्यातील लेखक सहभागी झाले आहेत. पहिले तीन भाग नागपूरचे नामवंत अनुवादक डॉ. असदुल्लाह यांनी घेतले. मराठी व उर्दू या दोन भाषा एकत्र आल्यास भाईचारा वाढेल म्हणून या कार्यक्रमांची नितांत गरज आहे. मराठी भाषेतील नाटक व व्यंग्यसाहित्य उर्दूत आणणे व उर्दू शायरी मराठीत भाषांतर करणे आमचे मुख्य कार्य असेल. यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, उर्दू विभागप्रमुख डॉ. म. शफी चोबदार व डॉ. सुमय्या बागबान व डॉ. आयेशा पठाण यांच्या सहकार्याचा गौरव केला. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी लेखकांना फोरमचे इकबाल बागवान (मो. 9552529277) यांच्याशी संपर्क साधता येईल. विद्यापीठाच्या डॉ. सुमय्या बागबान यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आयेशा पठान यांनी आभार मानले.