#RepublicDay2020: काय आहे या तीन ‘ए’ची रंजक कहाणी (Video)

सुस्मिता वडतिले 
Sunday, 26 January 2020

घरात बाळाचं आगमन झाले की त्यानंतर घरातील वातावरण अगदी बदलून जाते. त्यात ईथे तर एक सोडून तीन बाळ . त्यावेळी त्या मातेची स्थिती कशी झाली असेल याचा विचार ही आपण करू शकणार नाही. तिळ्यांचा विचार करूनच त्या माऊलीची जबाबदारी पेलण्याची खरी ताकद देऊन गेली.

सोलापूर : आई होणं हा प्रत्येक आईचा एक सुखद अनुभव असतो. मात्र, गरोदरपण ही एक खूप मोठी जबाबदारी असते. एका बाळाला जन्म दिल्यावरच मातेला किती त्रास सहन करावा लागतो.  इथे तर या माऊलीने एक नाय दोन नाय तर तिघांना एकाचवेळी जन्म दिला. सोलापूरमध्ये २६ जानेवारी २०१० रोजी डॉ. निलोफर झेलर यांची ही तिळी जन्माला आली.
घरात बाळाचं आगमन झाले की त्यानंतर घरातील वातावरण अगदी बदलून जाते. त्यात ईथे तर एक सोडून तीन बाळ . त्यावेळी त्या मातेची स्थिती कशी झाली असेल याचा विचार ही आपण करू शकणार नाही. तिळ्यांचा विचार करूनच त्या माऊलीची जबाबदारी पेलण्याची खरी ताकद देऊन गेली. त्या तिघांना पाहणं अधिकच मजेशीर असेल नाही का...? तिन्ही मुले कुणाचेही लक्ष वेधून घेतात. त्यांना सगळ्यांनाच यांचे अप्रूप वाटणारच यात काही शंका नाही. हे तिघे रविवारी (ता.२६ ) ११ व्या वर्षात पदार्पण करत आहेत.  सोलापूरातील ऑकिड स्कूलमध्ये चौथीत  एकाच वर्गात शिकत असलेल्या अक्सा, अयान व अमान  यांची ही कहाणी. 

यांच्या जन्मामध्ये दोन दोन मिनटांचा फरक आहे. जन्मावेळी त्यांचे वजन दोन किलो, अडीच किलो आणि दीड किलो असे होते. जेवणातील भाज्यांच्या आवडीनिवडी या तिघांच्या सारख्याच आहेत. आज २६ जानेवारी २०२० ला अक्सा,अमान आणि अमान यांना १० वर्ष पूर्ण होत आहेत. 
हेही वाचा- हम भी किसी से कम नही (Video) 

अक्सा, अमान, अयानला टिकटाॅकची आवड 
अमान आणि अयानला क्रिकेट आणि अक्टिंग कारायला खूप आवडते. तसेच
तिघांचे कॉमन म्हणजे  अक्सा, अमान, अयानला टिकटाॅक करायला खूप आवडते. एक विशेष म्हणजे यात एकाला रागावले तर तिघांच्या चेह-यावर नाराजी येते आणि तिघांनाही वाईट वाटते असे त्यांची आई डॉ. निलोफर यांनी सांगितले. 

अक्सा बँक म्हणून तिची ओळख

अक्साला पेंटिंग, अक्टिंग, स्पोर्ट्स, आणि रोज डायरी लिहायला खूप आवडते. अक्साला काही गोष्टी सांगायच्या असतील तर ती तिच्या आईला पत्र लिहून देते. त्यात सॉरी असो व थँक्यू हे सुध्दा असेच लिहून व्यक्त होते. आणि अक्सा ही तिच्या आईने तिला देलील पाॅकेटमनी जपून ठेवून जेव्हा कधी आई पैसे मागेल तेव्हा ती आईला मदत करते आणि एका  डायरीमध्ये लिहून ठेवते आणि आईला बोलते तुझे इतके पैसे देणे बाकी आहे.  त्यावेळेस तिच्या आई वडिलांना तिचे बोल खूप आवडतात. त्यामुळे घरात तिला अक्सा बँक म्हणून तिची ओळख तयार केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday of the three who were born together in Solapur