esakal | #Republic Day 2020 : हम भी किसी से कम नही (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Womens work with men in Solapur ST Agar

सोलापूर बस आगारात यांत्रिक विभागात काम करणाऱ्या पुरुषांबरोबर मॅकेनिक म्हणून महिला कर्मचारी कार्यरत आहेत. मॅकेनिक विभागाकडे महिला फिरकत नाहीत. अवजड काम आणि पुरुषांची मक्‍तेदारी म्हणून पाहिलेल्या या कामाकडे शक्‍यतो महिला फिरकत नसत. मात्र, सात महिलांनी धाडस केले आणि या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सध्या येथील आगारात सात महिला मॅकेनिक म्हणून गाड्यांची दुरुस्तीसह पुरुषांप्रमाणे सर्व कामे करत आहेत.

#Republic Day 2020 : हम भी किसी से कम नही (Video)

sakal_logo
By
सुस्मिता वडतीले

सोलापूर : ‘हम भी किसी से कम नही' याप्रमाणे सोलापुरातील एसटी बस आगारात "ती' त्याच्या बरोबरीने काम करत आहे. एसटीत पूर्वी महिला वाहक म्हणून काम करत होत्या. आता तिच्या हाती स्टेरिंगही येणार आहे. सोलापूर आगारात दोघींना त्यासाठी प्रशिक्षण सुरू आहे. तीन महिन्यांनंतर त्या चालक म्हणून रस्त्यावर येणार आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर एसटी आगारात मॅकेनिक, चालकसह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचा "सकाळ'ने घेतलेला हा आढावा. 
हेही वाचा- पती शहीद झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी
सोलापूर बस आगारात यांत्रिक विभागात काम करणाऱ्या पुरुषांबरोबर मॅकेनिक म्हणून महिला कर्मचारी कार्यरत आहेत. मॅकेनिक विभागाकडे महिला फिरकत नाहीत. अवजड काम आणि पुरुषांची मक्‍तेदारी म्हणून पाहिलेल्या या कामाकडे शक्‍यतो महिला फिरकत नसत. मात्र, सात महिलांनी धाडस केले आणि या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सध्या येथील आगारात सात महिला मॅकेनिक म्हणून गाड्यांची दुरुस्तीसह पुरुषांप्रमाणे सर्व कामे करत आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला हातावर मोजण्याइतकेच आहेत. म्हणून या महिला तरुणींसाठी आयकॉन ठरणाऱ्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या जिद्दीने व निष्ठेने काम करून स्वत:ला सिद्ध करत आहेत. या महिलांनी त्यांचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. सध्या अनेक क्षेत्रांत महिला कर्तबगारी सिद्ध करत आहेत. 

मॅकेनिक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर टायर फिटिंग करणे, सर्व्हिसिंग करणे, क्‍लच बदलणे, लायनर बदलणे, स्प्रिंग बदल करणे आणि टायर बदलणे ही प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले काम करत आहेत. त्यातून आयुष्यात असलेल्या अनंत अडचणींचा सामना करत कामाचा आनंदही घेत आहेत. विविध क्षेत्रात स्त्रियांनी पुरुषांची मक्‍तेदारी मोडीत काढली आहे. मनात इच्छा असेल आणि त्याला जिद्द, परिश्रमाची जोड मिळाली तर कोणतेही काम सहज शक्‍य होते. आणि "हम भी किसी से कम नही' हे त्यांनी सिद्ध केले आहे. 
हेही वाचा- त्याची धडपड संविधान चळवळ रुजवण्याची

वंदना निंबर्गीकर, मॅकेनिक : 10 वर्षांपासून बस आगारात मॅकेनिक म्हणून कार्यरत आहे. मला सोरेगाव येथून येण्यास अर्धा तास लागतो. मॅकेनिकचे काम करण्यास आनंद मिळतो. कामाची आवड निर्माण झाल्यास कामाची सवय होते. 

सविता पुजारी, मॅकेनिक :पाच वर्षांपासून बस आगारात मॅकेनिक म्हणून कार्यरत आहे. मला वडकबाळ गावातून कामास येण्यास पाऊण तास लागतो. मी, सासरकडील सर्वजण माझ्या कामात आनंदी आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे मी आज हे काम करत आहे.  

प्रज्ञा गायकवाड, मॅकेनिक : दोन वर्षांपासून बस आगारात मॅकेनिक म्हणून कार्यरत आहे. मला सुरवातीला कामाची पद्धत अवघड वाटत. परंतु, आता हेच काम आम्हाला आनंद देत आहे. 

पूनम डांगे, चालक : मी मूळची औरंगाबाद येथून सोलापुरात आले आहे. मला पूर्वीपासून ड्रायव्हिंगची आवड होती. त्यामुळे मी एसटी क्षेत्रात चालक म्हणून पहिल्याच परीक्षेत पास झाले. या कामासाठी मला माझ्या सासरकडील मंडळीचे पूर्ण सहकार्य मिळत असल्याने मी सर्व करू शकत आहे. 

दीक्षा घुले, चालक : मी मूळची नांदेड येथून सोलापुरात आले आहे. मला या क्षेत्रात येण्यासाठी माझे आई-वडील आणि माझ्या भावाची साथ आहे. त्यात मला अगोदरपासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने या कामाची सवय आहे. मनात जिद्द असेल तर कोणतेही काम आपण करू शकतोच. 

go to top