sakal

बोलून बातमी शोधा

Vanchit

आज सकाळी सात वाजता सोलापूर ते स्वारगेट (एमएच 13 सीयू 8339) या क्रमांकाची बस सोलापूर एसटी स्टॅंड येथे आगार व्यवस्थापक श्री. कुलकर्णी, स्थानक प्रमुख श्री. शिंदे, इन्चार्ज श्री. कोळी, विभाग नियंत्रक श्री. गायकवाड यांच्या उपस्थितीत एसटी बसची वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. एसटी बस चालक श्री. नायडू व वाहक अमर यादव यांना फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडीचा जल्लोष ! जिल्हाबाहेर जाणाऱ्या पहिल्या "एसटी'ची आतषबाजीने रवानगी 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 12 ऑगस्टला महाराष्ट्रासह राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर एसटी स्टॅंड येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक चालू करावी, या मागणीसाठी डफली बजाव आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलनास यश मिळाल्यामुळे आज (गुरुवारी) सकाळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. 

हेही वाचा : मोठी ब्रेकिंग! "या' 37 साखर कारखान्यांना सरकारची विनाअट थकहमी 

आज सकाळी सात वाजता सोलापूर ते स्वारगेट (एमएच 13 सीयू 8339) या क्रमांकाची बस सोलापूर एसटी स्टॅंड येथे आगार व्यवस्थापक श्री. कुलकर्णी, स्थानक प्रमुख श्री. शिंदे, इन्चार्ज श्री. कोळी, विभाग नियंत्रक श्री. गायकवाड यांच्या उपस्थितीत एसटी बसची वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. एसटी बस चालक श्री. नायडू व वाहक अमर यादव यांना फेटा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. तसेच प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. या वेळी कार्यकर्ते व प्रवाशांना लाडू वाटून फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. जल्लोषपूर्ण वातावरणात बसला झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. 

हेही वाचा : बेरोजगारी वाढली! नोकरी लावतो म्हणून दोघांना "एवढ्या' लाखांना फसविले 

या वेळी वंचित बहुजन महिला आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्या अंजना गायकवाड, वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेश्‍मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, सुजाता वाघमारे, 
नगरसेवक गणेश पुजारी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा निरीक्षक बबन शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत जाधव, नानासाहेब कदम, शिवाजी बनसोडे, हनमंतू पवार, विजय बमगोंडे, रवी थोरात, विनोद इंगळे, चंद्रकांत सोनवणे, देविदास चिंचोळकर, आरोग्य निरीक्षक विजय साळुंखे, संजय इंगळे, बाळासाहेब सदाफुले, सचिन शिंदे, विजय जाधव, शेरा मोकाशी, सचिन तीर्थंकर, सूरज जगताप, मुकेश मोकाशी, सूरज पाटील, कपिल सोनवणे, संतोष मैंदर्गीकर, सुमन लोंढे, पंडित सर्जे, अप्पासाहेब तळभंडारे, केतन कांबळे, पप्पू गायकवाड, राजू तळभंडारे, महेश कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

go to top