
राज्यातील 72 लाख घरगुती ग्राहकांना वीज कनेक्शन कट करण्याच्या नोटीसा बजावून लाखो कुटुंबांना अंधारात ठेवण्याचा घाट घातला आहे. शंभर युनिट वीज मोफत देण्याच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
सोलापूर : घरगुती, शेतीपंप, व्यापारी, लघुउद्योजक यांची कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, मीटर रिडींग न करता सरासरी दिलेली वीज बिले दुरुस्त करावीत, घोषणा केल्याप्रमाणे शंभर युनिट वीज मोफत द्यावी, यासाठी भाजपच्या वतीने बुधवारी (ता. २४) आरपारची लढाई म्हणून जिल्हाभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.
सोलापूरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
देशमुख म्हणाले, भाजप सरकारच्या काळात 45 लाख कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना तसदी लावली नाही किंवा एकही कनेक्शन कट केले नाही. याउलट आघाडी सरकारने शेतकऱ्यांनी न वापरलेल्या वीज बिलाची 50 टक्के रक्कम भरा असा फतवा काढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
राज्यातील 72 लाख घरगुती ग्राहकांना वीज कनेक्शन कट करण्याच्या नोटीसा बजावून लाखो कुटुंबांना अंधारात ठेवण्याचा घाट घातला आहे. शंभर युनिट वीज मोफत देण्याच्या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे एक वर्षाचे 1200 युनिट वीज बिलातून माफ करावे. लॉकडाऊन काळात मीटर रिडींग न घेता सरासरी अंदाजे लाखो रुपयांची वीज बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत. या सर्व बाबींचा विचार करून महावितरणने वीज बिले दुरुस्त करून नव्याने वीज बिले ग्राहकांना द्यावीत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड का ई-सकाळचे ऍप
घरगुती, शेतीपंप, व्यापारी, लघुउद्योजक यांची कोरोना काळातील वीज बिल माफ करावे, मीटर रिडींग न करता सरासरी दिलेली वीज बिले दुरुस्त करावीत, घोषणा केल्याप्रमाणे शंभर युनिट वीज मोफत द्यावी, यासाठी भाजपच्या वतीने जिल्हाभर आरपारची लढाई करण्यात येणार असून बुधवार (ता. 24) फेब्रुवारी रोजी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, घरगुती ग्राहक, व्यापारी, लघुउद्योजक हे जिल्हाभर जेलभरो आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी दिली.
माढामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर शहर मध्य खासदार शिवाचार्य महाराज, दक्षिण सोलापूर आमदार सुभाष देशमुख, सोलापूर शहर उत्तर आमदार विजयकुमार देशमुख, बार्शी आमदार राजाभाऊ राऊत, पंढरपूर व मंगळवेढा आमदार प्रशांत परिचारक, करमाळा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, अक्कलकोट आमदार सचिन कल्याणशेट्टी, माळशिरस आमदार राम सातपुते, सांगोला श्रीकांत देशमुख, मोहोळ विजयराज डोंगरे, संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष देशमुख व सोलापूर शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.