भाजपचा आता हा नारा... 

भाजपचा आता हा नारा... 

सोलापूर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडातील वर्षपूर्ती येत्या 30 मे ला होत आहे. त्यानिमित्त भाजपने विविध कार्यक्रम आखले आहेत. त्यामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारताबरोबरच "स्वदेशी'चा नारा दिला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडातील वर्षपूर्ती होत आहे. या काळामध्ये सरकारने कोणकोणते निर्णय प्रामुख्याने घेतले आहेत ते लोकांमध्ये जाऊन त्याची माहिती देण्याचे आवाहन प्रदेश भाजपने काढलेल्या पत्रामध्ये केले आहे. तीन तलाख, 370 कलम रद्द करणे, लदाखला केंद्रशाषित प्रदेश करणे, आयोध्या येथे राम मंदिराच्या निर्मितीचा मार्ग मोकळा होणे, नागरिकत्व कायद्यात सुधारणा करणे ही सरकारने केलेली कामे इतिहासात नोंद होण्यासारखी आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले जात आहे. या काळात त्यांनी देशवासियांसाठी केलेल्या घोषणांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजने अनेक व्यापार, शेतीसंबंधी उपाययोजना केल्या जाणार आहेत. 30 मेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. 30 मे ते 30 जून या एक महिन्याच्या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेले पत्र देशातील एक कोटी जनतेपर्यंत पोचविण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले आहे. हे पत्रक वाटप करताना कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टशिंगचे पालन करण्याबरोबरच प्रतिबंधित क्षेत्रात न जाण्याचे आवाहनही पक्षाने केले आहे. पक्षाच्यावतीने फेस कव्हर व सॅनिटायझरचे वाटप सुरु केले आहे. पक्षातील सर्व कार्यकर्ते स्थानिक स्वदेशी उत्पादनांच्या वापराचा संकल्प करणार आहेत. 

पक्ष घेणार व्हर्च्युअल मेळावे 
व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशभरात व्हर्च्युअल मेळावा घेतले जातील. त्यातील दोन मेळावे महाराष्ट्रात होणार आहेत. 100 व्हर्च्युअल परिषदा घेतल्या जातील. त्यामध्ये 40 मिनिटे नेत्यांचे संबोधन व 20 मिनिटे प्रश्‍नोत्तरे असतील. देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोचविण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही प्रदेश भाजपने कार्यकर्त्यांना केले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com