शहरातील ओम सच्चिदानंद वाचनालयात जिल्हा माहेश्वरी सभेने हे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराचे 31 वे वर्ष आहे. शिबिराचे उद्घाटन प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किसन भन्साळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव मदनलाल मिनीयार, चंद्रकांत तापडिया, बसंतीबाई भराडिया यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाषबापू देशमुख, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार नरसिंग मेंगजी, नगरसेवक आनंद चंदनशिवे, सभापती गणेश पुजारी, जगदीश पाटील यांची उपस्थिती होती.
सोलापूर ; जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला एकूण 275 रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला
शहरातील ओम सच्चिदानंद वाचनालयात जिल्हा माहेश्वरी सभेने हे आयोजन केले होते. रक्तदान शिबिराचे 31 वे वर्ष आहे. शिबिराचे उद्घाटन प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष किसन भन्साळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव मदनलाल मिनीयार, चंद्रकांत तापडिया, बसंतीबाई भराडिया यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाषबापू देशमुख, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार नरसिंग मेंगजी, नगरसेवक आनंद चंदनशिवे, सभापती गणेश पुजारी, जगदीश पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी कोरोना काळात अन्न सेवा देणारे व मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. दिवसभर चाललेल्या शिबिरांमध्ये एकूण 275 दात्यांनी रक्तदान केले.
रक्तसंकलनाचे काम गोपाबाई दमानी ब्लड बॅंक व अश्विनी ब्लड बॅंकेने वतीने करण्यात आले. शिबिरासाठी किरणकुमार राठी, गोकुळ झंवर, गिरीश जाखोटिया, सूर्यकांत तापडिया, प्रवीण चंडक, बाबुशेठ सोनी, ओमप्रकाश साबू, दामोदर दगड, मधुसूदन कालाणी, शामसुंदर तोष्णीवाल यांनी सहकार्य केले. शिबिराच्या सुरुवातीला जिल्हा सभेचे अध्यक्ष जवाहर जाधव यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सचिव गोविंद लाहोटी यांनी केले. किरणकुमार राठी यांनी आभार मानले