रक्तदान, नेत्रतपासणी व विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईलचे वाटप 

रक्तदान, नेत्रतपासणी व विद्यार्थ्यांना अँड्रॉईड मोबाईलचे वाटप 

सोलापूरः शहरांमध्ये ईद-ए-मिलाद निमित्त आज रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी व खाऊ वाटप आदीचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन अध्यापनासाठी अँड्रॉइड मोबाईलचे वाटपही करण्यात आले. 

शहरातील विजापूर वेस युवक मंडळ, लायन्स क्‍लब ऑफ सेंट्रल सोलापूर आणि लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे संयोजन अश्‍फाक बागवान यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमासाठी एमआयएमचे अध्यक्ष फारुख शाब्दी, इम्तियाज कमिशनर, अल्ताफ काल्लादी, एजाज बागवान, निसाल ठाकूर, रजित शेख, इरफान बागवान, इम्रान बागवान, लायन्स क्‍लबचे राजूभाई चौधरी, माजी अध्यक्ष चंद्रकांत यादव, सचिव डॉ. राजदत्त रासोलगीकर यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. हरीश दिकोंडा यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी डॉ. सुरज रणशूर, जनसंपर्क अधिकारी सुवर्णा काळे यांचीही उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार व शस्त्रक्रियांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरासाठी संयोजक अशफाक बागवान व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला. एमरॉन सोशल ग्रुपच्या वतीने सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले 


बारा ईमाम चौकाच्या भागात सोहेल कुरेशी यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेण्यात आले. कोरोना संकटामुळे सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्या दृष्टीने गरजू रुग्णांना रक्तपुरवठा मिळावा म्हणून या शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. उदघाटन कार्यक्रमासाठी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, माऊली पवार, संतोष पवार, तौफिक हत्तुरे, अजिज शेख, विनोद भोसले, संयोजक सोहेल कुरेशी. शकील मौलवी, बशीर शेख, जुबेर कुरेशी, विकार कुरेशी, युनूस मुर्शद,अयुब कुरेशी आदी उपस्थित होते. सोहेल कुरेशी वतीने गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी 10 अँड्रॉइड मोबाईल चे वाटप करण्यात आले. दुपारपर्यंत 39 रक्तदात्यांनी रक्तदान केले अतहर ब्लड बॅंकेने रक्त संकलन केले. कार्यक्रमासाठी अखलाद कुरेशी, रफिक कुरेशी, जुबेर कुरेशी, अफसान कुरेशी आदींनी सहकार्य केले. 

चंद्रकला नगर नई जिंदगी येथील अल फुरकान एज्युकेशनल अंड वेल्फेअर ट्रस्ट संचलित अल फुरकान मदरसा तर्फे दिनांक 30 ऑक्‍टोबर 2020 शुक्रवारी मोहम्मद पैगंबर(स.) जयंती निमित्त 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियान राबवण्यात आला यावेळी मास्क व साबण वाटप चा कार्यक्रम देखील करण्यात आला. 
चंद्रकला नगर परिसरात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत संस्थाध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर शेख यांनी कुटुंब प्रमुख व्यक्तींची व इतर लोकांची काय जबाबदारी आहे हे समजावून सांगितले. तसेच वाहनधारकांनासुद्धा मास्क व साबण देऊन त्यांच्यामध्ये माझ्या कुटुंबाची जबाबदारी याबद्दल जनजागृती केली. लोकांना स्वच्छतेचे नियम ,मास्क वापरण्याबाबत तसेच वारंवार हात धुणे बाबत जनजागृती करण्यात आली. आपण एक जबाबदार नागरिक असून स्वतःच्या व आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे अभियान राबवण्यात आले असल्याचे संस्थाध्यक्ष मौलाना हारिस दस्तगीर शेख यांनी यावेळी सांगितले. यावेळी दस्तगीर शेख ,हाफिज हुसेन ,वसीम शेख ,सुहेल गदवाल ,हाफिज परवेज, शाहरुख मुल्ला, हाफिज आरिफ हाफिज आमीर, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पैगंबर शेख पोलीस हवालदार ताजुद्दीन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष गुळवे आदी उपस्थित होते.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com