तब्बल तेरा वर्षांनंतर थॅलेसिमिया रुग्णांसाठी औषधी पुरवठा झाला सूरू 

thalicimia.jpg
thalicimia.jpg

सोलापूरः तब्बल तेरा वर्षानंतर औषध वाटपामधील गुंतागूंत सोडवत अखेर जिल्ह्यातील थॅलेसिमीया आजाराच्या बालकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात औषधी उपलब्ध झाली आहेत. या बालकांच्या पालकांना मागील काही वर्षापासून औषधासाठी करावी लागणारी वणवण आता थांबली आहे. अजूनही रक्ताच्या आजारांशी लढणाऱ्या मुलांच्या साठी अनेक सुविधांची गरज भासत आहे. 

वर्ष 2007 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सिव्हील हॉस्पिटलमध्ये थॅलेसिमीया या आजारासाठी रुग्णांना विशेष औषधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर औषधाचा पुरवठा अचानक बंद झाला होता. या आजाराचे रुग्ण हे बालक असतात. रुग्णांच्या पालकांनी औषधी मिळत नसल्याने कोल्हापूर, पुणे आदी भागातून औषधी मागवण्यास सुरवात केली. लॉकडाउनच्या काळात तर औषधी पुरवठ्याचे मोठे हाल झाले. तेव्हा या रुग्णांच्या पालकांनी ही औषधी उपलब्ध व्हावीत यासाठी पाठपुरावा केला. तेव्हा सात कोटी रुपयाचा हिशेब पूर्ण न झाल्याने नविन औषधी मागवता येत नाही असे उत्तर मिळाले. 

नंतर जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रदिप ढेले यांच्याकडे या पालकांनी समवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. तेव्हा त्यांनी औषधी मागवून घेण्यासाठी कोणतीच अडचण नसल्याचे सांगितले. तेव्हा फांउडेशनच्या सदस्यांनी त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाकडे मागणी नोंदवणे आवश्‍यक असल्याची विनंती केली. तेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे पत्र गेल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने तातडीने औषधी मागवून घेतली. थॅलेसिमीया रुग्णांना ज्या प्रमाणे रक्ताची गरज नियमीत लागते. तरीही त्यासोबत इतरांचे रक्त घेतल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलीत ठेवण्यासाठी डेसीरॉक्‍स या गोळ्या घेणे आवश्‍यक असते. या शिवाय या रुग्णांना जीवनसत्वाच्या गोळ्या देखील लागतात. अजुनही डेस्प्रॉल इंजेक्‍शन व हायड्रोयुरीया या औषधाचा पुरवठा लागणार आहे. 
रक्ताच्या आजाराच्या बाबत अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. हिमोफिलीया या आजारामध्ये उपचार म्हणून त्यांना रक्त गोठवणारा घटक फॅक्‍टर एट व नाईन हा लागतो. हा घटक सोलापूरमध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळे या रुग्णांचे पालक त्यासाठी पुणे, कोल्हापूर व इतर शहरात जातात. या शिवाय जिल्हा रुग्णालयात या रुग्णांसाठी डे केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी देखील अद्याप पूर्ण झालेली नाही. आरोग्य खात्याचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी देखील हे सेंटर सुरू करण्याचे आश्‍वासन दिले आहे. सध्या तरी या आजाराच्या बालकांची औषधी व सेवा मिळवण्यासाठी धडपड अजूनही थांबलेली नाही. 

डे केअर सेंटर व्हावे 
रक्ताच्या आजारांच्या रुग्णांना सोलापूर शहरात सर्व औषधी व उपचार एकाच छताखाली म्हणजे डेकेअर सेंटरद्वारे उपलब्ध व्हावेत. म्हणजे बाहेरगावी जाऊ औषधी व इतर सेवा मिळवण्यासाठी होणारी धावपळ थांबेल 
- सचिन गुळग, जिल्हाध्यक्ष, समवेदना फाऊंडेशन सोलापूर 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com