पंढरपूर तालुक्‍यातील युवकाला टिकटॉकवर बदनामी करणे पडले महागात 

A case has been registered against a youth from Pandharpur taluka for defaming on a tiktok
A case has been registered against a youth from Pandharpur taluka for defaming on a tiktok
Updated on

रोपळे बुद्रूक (जि. सोलापूर) : मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील एका युवकाला टिकटॉकच्या माध्यमातून महापुरूषाच्या छायाचित्रात बदल करून तो व्हायरल केल्यामुळे थेट झेलची हवा खावी लागती. दरम्यान, सोशल मीडियावर संबंधित महापुरूषाचे छायाचित्र खराब करून त्यांचा अनादर केल्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निमार्ण झाले आहे. 
याबाबत करकंब (ता. पंढरपूर) येथील पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील विशाल हरीदास नागणे याने त्याच्या मोबाईलमध्ये टिकटॉक ऍपवर महापुरूषाच्या छायाचित्राला कपाळावर लाल टिकली, ओठाला लाली व डोक्‍यावर लांब केस असा व्हीडीओ तयार करून तो व्हायरल केला. तसेच त्यांचा सोशल मीडियावर फोटो खराब करून अनादर केला. ही घटना आज मंगळवार (ता. 12) रोजी उघडकीस आल्यामुळे या घटनेची फिर्याद बाळासाहेब नवनाथ शिंदे (35, रा. मेंढापूर, ता. पंढरपूर) यांनी करकंब पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात तनावपूर्ण वातावरण तयार झाल्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे व करकंब पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीतीची पाहणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुण मेंढापूर व पांढरेवाडी या दोन्ही गावात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली असून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com