कोरोना : अक्कलकोट शहरावर लवकरच तिसऱ्या डोळ्याचे लक्ष 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 एप्रिल 2020

तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील बंडगर यांच्या संकल्पनेतून शहरात प्रमुख चौकात व संवेदनशील भागात सीसीटीव्ही व स्पीकर बसविण्यात आलेले होते. पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व उपलब्ध पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी सीसीटीव्ही व स्पीकरचा फार मोठा उपयोग पोलिस खात्याला यापूर्वी झालेला होता.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट शहरातील देखभालीअभावी बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे व स्पीकर दुरुस्तीचे काम चार दिवसांपासून सुरू असून एक दोन दिवसांत पूर्ण यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. यासाठी अक्कलकोट नगरपालिकेचे सहकार्य लाभणार असून आता लवकरच शहरावर तिसरा डोळा लक्ष ठेवणार आहे. 
तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील बंडगर यांच्या संकल्पनेतून शहरात प्रमुख चौकात व संवेदनशील भागात सीसीटीव्ही व स्पीकर बसविण्यात आलेले होते. पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व उपलब्ध पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी सीसीटीव्ही व स्पीकरचा फार मोठा उपयोग पोलिस खात्याला यापूर्वी झालेला होता. नंतर देखभालीअभावी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. सध्या कोरोना व्हायरसची साथ राज्यभर असल्याने संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासन व पोलिस खात्यावरचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने बाहेर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेराचा व स्पीकरचा मोठा उपयोग होऊ शकतो. यासाठी येणारा मासिक देखभाल व दुरुस्ती खर्च अक्कलकोट नगरपालिका उचलणार असल्याने पुन्हा ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आशा राऊत यांनीसुद्धा यास दुजोरा दिला आहे. सध्या शहरात एकूण 48 कॅमेरे व 10 स्पीकर असून त्यापैकी 42 कॅमेरा दुरुस्त झालेले आहेत. 
हेही वाचा : 

aschim-maharashtra-news/solapur/full-curfew-monday-thursday-solapur-282778" target="_blank">सोलापुरात सोमवार ते गुरुवारपर्यंत संपूर्ण संचारबंदी
शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे स्पीकर पूर्णक्षमतेने चालू होणार आहेत. सीसीटीव्ही तंत्रज्ञ इब्राहिम कारंजे म्हणाले की सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यासाठी मोफत तांत्रिक साहाय्य करण्यास तयार आहे व यापूर्वी केलेले आहे. फक्त मासिक देखभाल दुरुस्तीसाठी मजुरांच्या मजुरीचा खर्च नगरपालिका करणार आहे. नगरपालिकेच्या सहकार्याने सर्व कॅमेरे सुरू होत आहेत. मगील चार दिवसापासून सीसीटीव्ही दुरुस्तीचे काम सुरू असून एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू झाल्याने पोलिसांवरचा ताण कमी होणार आहे. तसेच स्पीकरद्वारे सूचना देऊन शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर बसल्याजागी नियंत्रण ठेवता येणार आहे. यामुळे प्रशासनाचे व पोलिस खात्याचे श्रम व वेळेची बचत होणार आहे. सीसीटीव्हीचे कंट्रोलिंग अक्कलकोट नगरपालिका व उत्तर पोलिस ठाणे येथून केले जाणार आहे. 
मुख्याधिकारी आशा राऊत म्हणाल्या, शहरातील सर्व सीसीटीव्ही व स्पीकरचा दुरुस्ती व देखभालीचा खर्च अक्कलकोट नगरपालिका उचलणार आहे. 

पोलिस निरीक्षक के. एस. पुजारी म्हणाले, शहरातील सीसीटीव्हीद्वारे रस्त्यावर विनाकारण फिरणारे, गर्दी करून गप्पा दंग असणाऱ्यांचे चित्रण होणार असून सदर चित्रण बघून संबंधितावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCTV camera in Akkalkot city soon