
याबाबत माहिती अशी की, बर्ड फ्लूची साथ आली असल्याबद्दल शासनाकडून अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच याबाबत विविध प्रकारची काळजी घेतली जावी असे आवाहन केले जात आहे.
सोलापूरः बर्ड फ्लूच्या प्रकारामुळे शहरातील चिकन व अंडी विक्रेत्यांच्या दररोजच्या व्यवसायामध्ये घट झाली आहे. दरवर्षी हिवाळ्यात अंडी व चिकन विक्रीचा आकडा निम्म्याने घटला आहे.
हेही वाचाः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापुरात बैठक शिवसेनेची बैठक, नगरविकासचा आढावा
याबाबत माहिती अशी की, बर्ड फ्लूची साथ आली असल्याबद्दल शासनाकडून अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच याबाबत विविध प्रकारची काळजी घेतली जावी असे आवाहन केले जात आहे.
विक्रेत्यांच्या दृष्टीने बर्ड फ्लूची साथ काही प्रमाणात अडचणीची ठरली आहे. शहरामध्ये चिकन हे स्थानिक पुरवठादारासोबत मिरज भागातून देखील उपलब्ध केली जात आहे. तसेच अंडी देखील हैदराबाद बाजारातून मोठ्या प्रमाणात आणली जातात. मात्र बर्डफ्लूमुळे दररोज होणारी विक्रीची उलाढाल कमी झाली आहे.
त्यामुळे जे विक्रेते दररोज आठ ते दहा ट्रे अंडी विकत होते त्यांची विक्री आता केवळ 2 ते 3 ट्रे एवढी कमी झाली आहे. चिकनच्या बाबतीतही हीच अडचण झाली आहे. शहरातील विक्रेते हे बाहेरगावावरून चिकन मागवतात. त्या चिकनची गुणवत्ता व बर्डफ्लू बाबत घेतलेली काळजी याबाबतीत विक्रेते ग्राहकांना समजून सांगत आहेत. तरी देखील मागणीमध्ये घट झाली आहे.
प्रत्यक्षात हिवाळ्यामध्ये चिकन व अंडी विक्रीचा हंगाम सर्वात मोठा असतो. नियमित व्यायाम, उत्साहपूर्ण वातावरण आणि इतर गोष्टींमुळे हा या हंगामात मागणी खुप अधिक असते. नेमका याच हंगामाला मोठा फटका बसला आहे. ग्राहकांमध्ये सुरक्षेबाबत जागरुकता येईपर्यंत एक ते दोन आठवडे मागणीमध्ये घट कायम राहील व नंतर पुन्हा मागणी वाढेल असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. कोरोनाच्या काळामध्ये देखील मागणी घटल्यानंतर नंतर अचानक चिकन व अंडीचे भाव वाढल्याचा अनुभव पाठीशी आहे. याही वेळी मागणी पुन्हास्थिरावले असे मानले जाते.
जागरुकतेने परिस्थितीत बदल होईल
सध्या बर्ड फ्लुमुळे काही प्रमाणात मागणी घटली आहे. मात्र चिकन व अंडीच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेत राहिल्याने पुन्हा विक्रीत वाढ होईल अशी आशा आहे
- अब्दूल सलाम, चिकन व अंडी विक्रेता, सत्तरफूट रस्ता, सोलापूर.