
शासकिय विश्रामगृहात शिवसेनेची बैठक
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या (शनिवार) दुपारी 1.30 वाजता सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहात सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शिवसेना व शिवसेना प्रणित सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे व बैठकीला येताना मास्क परिधान करावा. सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे व सोलापूर शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी केले आहे.
सोलापूर : राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उद्या (शनिवार, ता. 16) सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजता हेलिकॉप्टरने ते सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर सोलापूर महापालिकेमध्ये ते आढावा बैठक घेणार आहेत. महानगरपालिका अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा ते या बैठकीत घेणार आहेत.
महापालिका आयुक्त व इतर अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास मंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायती अंतर्गत एकत्रित विकास नियंत्रण नियमावली अंमलबजावणी व विकास कामांचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील संबंधित नगर परिषद व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत दुपारी 4 पर्यंतचा वेळ हा त्यांनी राखून ठेवला आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते उस्मानाबादकडे जाणार आहेत.