मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निमा राज्य पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत समजून घेतले डॉक्‍टरांचे प्रश्‍न: वाचा सविस्तर

DOCTOR.jpg
DOCTOR.jpg
Updated on

सोलापूरः राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निमा या वैद्यकीय व्यावसायिक संघटना  राज्प पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत ईम्युनिटी क्‍लिनीक या संकल्पनेसोबत निमाच्या अनेक मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. 

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील निमा पदाधिकाऱ्यांशी मंगळवारी (ता.21) रात्री ऑनलाइन संवाद साधला. मुंबईच्या माजी महापौर तथा निमाच्या महिला आघाडीच्या डॉ शुभा राऊळ, निमा मुंबईचे अध्यक्ष डॉ. संजय लोंढे यांच्यासह या सभेमध्ये निमा, आयएमए, होमिओपॅथी कौन्सिल, युनानी व्यावसायिक संघटना, बीजीए इत्यादी संघटनेचे राज्य पदाधिकारी सहभागी झाले होते. कोविंड 19 टास्क फोर्स महाराष्ट्रचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. सतीश व्यास, डॉ. शशांक जोशी, निमाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ.आशुतोष कुलकर्णी, डॉ. जि. एस. कुलकर्णी, डॉ. अनिल बाजारे, डॉ. भूषण वाणी, डॉ. गजानन पडघन, डॉ. शैलेश निकम, डॉ.नितीन कोथळे, डॉ. के. टी. पाटील, डॉ. विजय माने, डॉ. श्रीराम कल्याणकर, डॉ.कौशल कुमार सिंग, डॉ. दर्शना शर्मा, डॉ. किरत राम्भीया, डॉ. मनिषा पवार, डॉ. जय मिनी, डॉ. प्रज्ञा चौगुले, डॉ. समीर घोलप, डॉ. चंद्रशेखर तावरे यांच्यासह निमाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

डॉ.आशुतोष कुळकर्णी आणि केंद्रीय अध्यक्ष डॉ. विनायक टेंभुर्णीकर यांनी सर्व बिएएमएस व बियुएमएस डॉक्‍टरांचे प्रश्न मांडले. सर्व खाजगी डॉक्‍टरांचा 50 लाखाचा आरोग्य विमा उतरवण्यात यावा. सर्व खाजगी डॉक्‍टर व त्यांच्या कुटुंबियांची शासकीय खर्चातून उपचाराची सोय व्हावी. बिएएमएस आणि बियुएमएस शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना एमबीबीएस डॉक्‍टरांप्रमाणे समान वेतन द्यावे. 
गंभीर ते अतिगंभीर कोरोना रुग्णांसाठी आयुर्वेदिक युनानी उपचारांचा कोविड ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये समावेश करावा. प्रतिकारशक्ती आणि कोविडचा परस्पर संबंध आणि त्यात आयुर्वेदाचे महत्व या आधारे निमा महाराष्ट्र राज्य शाखा आणि महाराष्ट्र शासन यांचे संयुक्त विद्यमाने "इम्युनिटी क्‍लिनिक' ही संकल्पना राबविण्याच्या बाबत सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी इम्युनिटी क्‍लिनिक संकल्पना याबद्दल पावले उचलण्यास कोविड टास्क फोर्सला सुचित केले. 

राज्यभरातील डॉक्‍टरांना मिळेल दिलासा 
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागण्यांसंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पुढील काळात या बाबत डॉक्‍टरांना कोरोना संकटात उपचार करत असताना शासनाचे पाठबळ अधिक भक्कम होईल 
- डॉ.विनायक टेंभुर्णीकर, केंद्रीय अध्यक्ष निमा संघटना. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com