जिल्हाधिकारी अन्‌ महापालिका आयुक्तांनी डावलला आरोग्यमंत्र्यांचा "हा' आदेश ! 

Hospital Audit
Hospital Audit
Updated on

सोलापूर : महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून बिलाची रक्‍कम घेतली जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सोलापूर शहरातून महापालिका अधिकाऱ्यांना व योजनेच्या समन्वयकांकडे 40 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. रुग्ण तथा रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटल प्रशासनात वादाचे प्रसंगही उद्‌भवले. या पार्श्‍वभूमीवर रुग्णांच्या बिलाचे ऑडिट करण्यासाठी ऑडिटरची नियुक्‍ती करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मात्र, अद्याप त्यानुसार कार्यवाही झालेली नाही. 

राज्यातील सर्वच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. तर उपचाराची रक्‍कम दीड लाखाहून अधिक झाल्यास अशा रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखांपर्यंत लाभ मिळेल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सोलापूरसह राज्यभरातील एक हजाराहून अधिक रुग्णालये या दोन्ही योजनांत समाविष्ट आहेत. मात्र, सद्य:स्थितीत सोलापूर शहर-जिल्ह्यातील 41 पैकी अवघ्या नऊ रुग्णालयांतूनच कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. यापैकी काही रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अतिरिक्‍त बिलाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बिलांच्या तक्रारींसंदर्भात नियुक्‍त समितीने काही तक्रारींचा निपटारा केला आहे. मात्र, वाढत्या तक्रारी पाहून आता शहर व जिल्ह्यासाठी स्वतंत्र ऑडिटर नियुक्‍त करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. तरीही अद्याप ऑडिटर नियुक्‍ती झालेली नाही. जिल्ह्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तर शहरासाठी महापालिका आयुक्‍तांमार्फत ऑडिटरची नियुक्‍ती करणे अपेक्षित आहे. 

तक्रारींचे असे आहे स्वरूप... 

  • महात्मा फुले जनआरोग्य योजनेस पात्र असतानाही मिळाला नाही लाभ 
  • योजनेस पात्र असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने मागितली बिलाची रक्‍कम 
  • कोरोना पॉझिटिव्ह आहे, परंतु लक्षणे नसल्याने योजनेत पात्र नसल्याचे मिळते उत्तर 
  • जनआरोग्य योजनेतून मिळते 25 आणि 50 हजारांचे पॅकेज; त्यावरील रकमेची हॉस्पिटलकडून मागणी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com