कोरोना : एसटी, पेट्रोल पंप बंदमुळे ग्रामीण भागात नागरिकांची पायपीट

Citizens have to walk because ST is closed
Citizens have to walk because ST is closed

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन केला आहे. मात्र, शेवटच्या घटकांची यातून काय परस्थिती होईल, याचा विचार केलेला दिसत नाही. राज्यभर संचारबंदी लागु असून यामध्ये सर्व एसटी वाहतुक, सामान्यांना पेट्रोल देणे बंद केले आहे. त्याची झळ ग्रामीण भागातील नागरिकांना सोसावी लागत आहे. शहराजवळ गाव आहे, त्यांना पाच ते सात किलोमीटरची पायपीट करुन अत्यावश्‍यक सुविधा घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे. 
कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतात याचे रुग्ण वाढत असून रुग्ण बरे होऊन घरी सुद्धा जात आहेत. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संचारबंदी लागु केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लॉकडाऊन केला आहे. मात्र याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. ग्रामीण भागात सर्वत्र पोचलेली एसटी सध्या बंद आहे. त्यामुळे नागरिकांना शहराकडे येणे सुद्धा अवघड झाले आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यात अनेक पेट्रोलपंप बंद आहेत. जे आहेत तेथे सर्व सामान्यांना पेट्रोल व डिझेल मिळत नाही. त्यामुळे खासगी गाड्या सुद्धा येत नाहीत. याचा फटका रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ग्रामीण भागात अनेक गावात अद्याप रुग्णलये नाहीत. मग कोण आजारी पडले तर त्यांना शहराकडे यावे लगते. मात्र रुग्णालयात येण्यासाठी एसटी नाही, की खासगी वाहने. अशा स्थितीत खासगी गाड्याने येईचे तर पेट्रोल मिळत नाही. त्यामुळे अनेकांना चालत यावे लागत आहे. यातून कोरोना होईल की, नाही माहिती नाही, पण उन्हात चालल्याणे आजारी पडण्याची भिती नागरिक व्यक्त करत आहेत. 
महराष्ट्रात पुण्यात पहिला कोरोनाची लागण झालेला रुग्ण आढळला. त्यानंतर मुंबई, नगर, सातारा, सांगली असं करत तो सर्वत्र हापपाय पसरु लागला. अशा रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन सरकारने खबरदारी घेतली. मात्र याच्या भितीने मुंबई व पुण्यातील कामाधंद्याच्या शोधात गेलेले अनेकजण खेड्याकडे वळाले. शहरातील अनेक उद्योग, व्यवसाय व कंपन्या बंद झाले. पण येथील नागरिक ग्रामीण भागात गेल्याने याचा संसर्ग वाढण्याच्या भितीने सरकारने एक एक करत राज्यात संचारबंदी, एसटी वाहतुक बंद, खासगी वाहतुक बंद, त्यानंतर जिल्ह्याची सिमा सील करणे असे निर्णय घेतले. त्यानंतर पेट्रोलपंप बंद करण्याचाही निर्णय घेतला. 
सोलापूर जिल्ह्यात करमाळ्याच्या जवळ रोशेवाडी, देवळाली, पांडे, पोथरे ही गावे आहेत. या गावातील नागरिकांचे सर्व व्यहवार हे करमाळ्यात होतात. हे फक्त उदाहरण म्हणून आहे. सोलापूर शहरासह अनेक गावे अशी आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी शहरात यावे लागते. यात अनेकांकडे दुचाकी असतात तर काहींकडे दुचाकी नाहीत. त्यांना शहराकडे येण्यासाठी एसटीचा वापर करावा लागतो. किंवा खासगी वाहतुकीचा मात्र, सध्या खासगी वाहतुकही बंद झाली आहे. एखाद्या रुग्णाला घेऊन येईचे म्हटले डिझेलचे कारण सांगून गाड्या आणल्या जात नाहीत, त्यामुळे मुख्यमंत्रीसाहेब जरा आमचाही विचार करा, अशी अर्थहाक सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. शुक्रवारी करमाळ्याचा आठवडी बाजार असतो. या बाजारात खरेदी करण्यासाठी अनेकजण येतात. या बाजाराला आज पोथरे येथील अनेकांवर चालत येण्याची वेळ आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com