महूदमध्ये नागरिकांनी अशी घेतली काळजी

 Citizens in Mahud took such care
Citizens in Mahud took such care
Updated on

महूद (ता. सांगोला, जि. सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील महूद येथील नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. सुमारे सात हजार लोकसंख्येला पुरेल इतक्‍या गोळ्यांचे वाटप करण्यात येऊन उपस्थित नागरिकांचे थर्मल गन द्वारे तापमान तपासण्यात आले. 

येथील माजी सरपंच धोंडीराम खबाले यांच्या स्मरणार्थ माधव खबाले यांच्यावतीने तर सांगली येथील टीम तरुणाई आणि फ्रेंड्‌स फाउंडेशन यांच्या सहयोगातून हा कार्यक्रम घेण्यात आला. येथील महादेव मंदिरात झालेल्या कार्यक्रमास सरपंच बाळासाहेब ढाळे,उपसरपंच दिलीप नागणे,पोलीस पाटील प्रभाकर कांबळे,ग्रामविकास अधिकारी सतीश साळुंखे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक आबाजी क्षिरसागर,बाळासाहेब खबाले,भिमराव नागणे, समीर मुलाणी,तानाजी खबाले,बाबुराव नागणे, यशवंत खबाले,कैलास खबाले आदी उपस्थित होते. 

टीम तरुणाई चे सांगली जिल्हा समन्वयक सुनील माने,डॉ.राकेश करे,डॉ.चेतन कराडे,डॉ.माधव खबाले यांनी उपस्थित नागरिकांचे थर्मल गन द्वारे तापमान मोजले. कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. या कठीण काळात नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने जागरूक असणे आवश्‍यक आहे. स्वतःची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीच्या उपायांची माहिती दिली.

आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या अर्सनिक अल्बम 30 या औषधाच्या सेवनाबाबत माहिती दिली. सुमारे सात हजार नागरिकांना पुरेल इतक्‍या औषधी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी कोरोना संबंधित सुरक्षिततेच्या सर्व सूचनांचे व नियमांचे पालन करण्यात आले. 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com