राष्ट्रीयीकृत बॅंक शाखांच्या कारभारावर शहर कॉंग्रेसची जोरदार टिका 

congress .jpg
congress .jpg

सोलापूरः शहरांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंकांच्या वतीने देण्यात येणारे सेवा अडचणी संदर्भात गांभीर्याने विचार व्हावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 

सोलापूर शहर कॉंग्रेस सचिव प्रा. राहुल बोळकोटे, उपाध्यक्ष व्हि.डी. गायकवाड, प्रवक्ते प्रा. डॉ. पंकज शरणार्थी, कॉंग्रेसचे सहसचिव सुनील व्हटकर, महेश कुंभार, सिद्धार्थ कलशेट्टी, सागर महेत्रे, सुनील धानगोंडा, प्रा.प्रमोद मनुरे आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरातील राष्ट्रीयीकृत बॅंक शाखांच्या समस्यांबाबत लक्ष वेधून मागण्या केल्या. 

सोलापूर शहरामध्ये असलेल्या राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बॅंकेमध्ये गेल्यानंतर ग्राहकांना सौजन्याची वागणूक दिली जात नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांना बॅंकेचे कर्मचारी ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देतात. प्रसंगी अरेरावीची भाषा वापरली जाते. शहरातील एटीएम सेवा व्यवस्थितपणे कार्यरत नाही. अनेक एटीएम केंद्रात मोकाट कुत्री बसलेली असतात. एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नाहीत. एटीएमच्या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आल्यास बॅंकेचा प्रतिनिधी उपलब्ध होत नाही आदी मुद्दे या पदाधिकाऱ्यांनी मांडले. 
बॅंक ग्राहकांच्या अडचणी सोडवणे आवश्‍यक आहे. नागरिकांना बॅंकेमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी पैसे भरण्याची मशीन वांरवार बंद पडते. या यंत्रणा सुरळीत कराव्यात. एटीएम मशीन सुरळीत चालावेत. शहरात मोबाईल एटीएम सुरु करावे ते अशा मागण्याही त्यांनी केल्या. हे प्रश्न न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन बॅंक ऑफ इंडिया झोनल अधिकारी अजय  कडू, अग्रणी जिल्हा बॅंकेचे प्रबंधक प्रशांत नाशिककर यांना देण्यात आले आहे. तसेच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्यमंत्र्यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com