सकाळ इफेक्‍ट : हिंगणी प्रकल्पाने घेतला मोकळा श्वास; भरावावरील वृक्ष व झुडपे काढून परिसर केला स्वच्छ 

शांतिलाल काशीद 
Wednesday, 5 August 2020

बार्शी तालुक्‍यातील हिंगणी मध्यम लघु प्रकल्प हा हिंगणी, पिंपरी (सा), उपळे, साकत, मळेगाव, जामगाव, नांदनी, हळदुगे, लाडोळे, मानेगाव, घाणेगाव, तडवळे, काळेगाव आदी गावांसाठी वरदान ठरला आहे. 1972 च्या दुष्काळात बांधलेला प्रकल्प संबंधित विभागाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे धोकादायक बनला होता. भरावाच्या दोन्ही बाजूंनी वाढलेले मोठे वृक्ष व झुडपे यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. 

मळेगाव (सोलापूर) : वृक्षवेली व झुडपांनी व्यापलेल्या हिंगणी मध्यम प्रकल्पाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. धरणाच्या परिसरातील, भरावावरील धोकादायक पद्धतीने उगवलेल्या वृक्ष व झुडपांमुळे धरणाला धोका निर्माण झाला होता. धरणाची सुरक्षितता विचारात घेता संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावयास हव्या होत्या. मात्र तसे न झाल्याने याबाबत "सकाळ'ने 21 मेच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन संबंधित विभाग खडबडून जागे होऊन प्रकल्पाच्या भरावावरील वृक्ष व झुडपे काढून परिसर स्वच्छ केला आहे. 

हेही वाचा : खुषखबर! दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळणार "या' दिवशी गुणपत्रिका 

बार्शी तालुक्‍यातील हिंगणी मध्यम लघु प्रकल्प हा हिंगणी, पिंपरी (सा), उपळे, साकत, मळेगाव, जामगाव, नांदनी, हळदुगे, लाडोळे, मानेगाव, घाणेगाव, तडवळे, काळेगाव आदी गावांसाठी वरदान ठरला आहे. 1972 च्या दुष्काळात बांधलेला प्रकल्प संबंधित विभागाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे धोकादायक बनला होता. भरावाच्या दोन्ही बाजूंनी वाढलेले मोठे वृक्ष व झुडपे यामुळे भविष्यात मोठा अनर्थ होतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. 

हेही वाचा : "या' महापालिकेने दिला नाही कर्मचाऱ्यांना अठरा वर्षांपासून महागाई भत्ता; पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाचीही प्रतीक्षाच ! 

शेतकऱ्यांच्या उद्विग्न भावना व धरणाची सुरक्षितता विचारात घेत "सकाळ'च्या 21 मे रोजीच्या अंकातून प्रकाशित केलेल्या बातमीमुळे झोपलेले प्रशासन खडबडून जागे झाले. संबंधित विभागाने प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन संपूर्ण भरावावरील वृक्षवेली काढून भराव परिसर स्वच्छ केला. त्यामुळे धरणाने मोकळा श्वास घेतला आहे. तसेच भरावाच्या आतील बाजूस पीचिंग क्षेत्राजवळील गाळ उपसण्यास बंदी देखील घालण्यात आली आहे. हिंगणी मध्यम प्रकल्पामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ऊस, द्राक्ष, सीताफळ, बोर बागांचे क्षेत्र वाढले असून शेती धरणावर अवलंबून आहे. धरण क्षेत्रातील सर्व गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. मात्र केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धरणाची सुरक्षितता धोकादायक बनली होती. भरावावरील वृक्षवेली काढल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleaned the area by removing dangerous trees and shrubs from the Hingani project