मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यात आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, पानपट्टी 31 जुलैपर्यंत बंद

अशोक मुरुमकर
बुधवार, 1 जुलै 2020

सोलापूर जिल्ह्यात कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आठवडी बाजार बंद करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी गर्दी होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आठवडी बाजार बंद करण्यासंदर्भात आदेश लागू केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, मॉल्स 31 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोनाची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस होऊ शकते. त्यामुळे लोकांचा समूह एकत्र जमू नये यासाठी सर्व प्रकारचे आठवडी बाजार, जनावरांचे बाजार, मॉल्स भरवण्यास आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. याबरोबर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पानपट्टी, मावा विक्री, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्री केंद्र बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत. 
तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व धुम्रपान करणे यामुळे कारोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. हे टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला 31 जुलै 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत बंदी करण्यात आली आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती संस्था अथवा संघटना यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे नमूद आदेशात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector orders to close weekly market till July 31 in Solapur district