esakal | एकतेचे दर्शन : "या' ऐतिहासिक वाड्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी केली श्रीरामासह विठुरायाची सामुदायिक आरती 
sakal

बोलून बातमी शोधा

Holkar Wada

अशपाक सय्यद, इब्राहिम बोहरी, इक्‍बाल बागवान, समीर बेंद्रेकर, अकबर शेख, नागेश भोसले, दिलीप धोत्रे, राजेंद्र महाराज मोरे, आदित्य फत्तेपूरकर, श्‍याम गोगाव, चंदू दंडवते, गिरीश बोरखेडकर, माधव ताठे-देशमुख, विजय बंटी वाघ यांच्या हस्ते श्रीराम व विठुरायाची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी "जय श्रीराम' असा एकच नारा दिला. सर्व मुस्लिम बांधवांचा होळकर संस्थेच्या वतीने व्यवस्थापक फत्तेपूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

एकतेचे दर्शन : "या' ऐतिहासिक वाड्यात हिंदू-मुस्लिम बांधवांनी केली श्रीरामासह विठुरायाची सामुदायिक आरती 

sakal_logo
By
अभय जोशी/भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 250 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या येथील होळकर वाड्यातील राम मंदिरामध्ये आज हिंदू व मुस्लिम बांधवांच्या वतीने सामुदायिक आरती करण्यात आली. अयोध्या येथील श्री राम मंदिराचे भूमिपूजन झाले. त्या निमित्ताने पंढरपुरात देखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने पंढरपुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवून होळकर वाड्यातील राम मंदिरात रामाच्या सोबतच विठुरायाची देखील आरती गायली. 

हेही वाचा : खुषखबर! दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळणार "या' दिवशी गुणपत्रिका 

अशपाक सय्यद, इब्राहिम बोहरी, इक्‍बाल बागवान, समीर बेंद्रेकर, अकबर शेख, नागेश भोसले, दिलीप धोत्रे, राजेंद्र महाराज मोरे, आदित्य फत्तेपूरकर, श्‍याम गोगाव, चंदू दंडवते, गिरीश बोरखेडकर, माधव ताठे-देशमुख, विजय बंटी वाघ यांच्या हस्ते श्रीराम व विठुरायाची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर सर्व उपस्थितांनी "जय श्रीराम' असा एकच नारा दिला. सर्व मुस्लिम बांधवांचा होळकर संस्थेच्या वतीने व्यवस्थापक फत्तेपूरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा : मंत्री म्हणाले, गुरुजींच्या आपसी बदल्या करू; मात्र आदेश निघत नसल्याने वाढला गोंधळ! 

याबरोबरच राम जन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळयाच्या निमित्ताने आज पंढरपूर शहर व तालुक्‍यातील श्रीराम मंदिरांमध्ये आरती आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी घरांसमोर रांगोळ्या आणि घरांवर भगवी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंढरपूर शहर राजपूत समाज सेवा मंडळाच्या वतीने आज पंढरपुरातील कारसेवकांचा सत्कार करण्यात आला. तर विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटून मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद साजरा केला. 
दरम्यान, शहर व तालुक्‍यात कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मशिदींना आज पोलिस संरक्षण देण्यात आले होते. प्रत्येक गावात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. आज सकाळपासून शहर व तालुक्‍यातील हनुमान आणि श्रीराम मंदिरांत आरत्या आणि भजनाचे कार्यक्रम करण्यात आले. 

राजपूत समाज सेवा मंडळाच्या वतीने आज पंढरपूर शहरातील कारसेवांचा सत्कार करण्यात आला. त्यापूर्वी विश्ववंदनीय शार्दुल महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बादलसिंग ठाकूर व अविनाश जव्हेरी यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी भाजपचे उमेश वाघोलीकर, काशिनाथ थेटे, शिरीष कटेकर, आशुतोष बडवे, धनंजय कोकणे, रवींद्र लोंढे, विठ्ठल वाघोलीकर, अजित काशीद, दत्तात्रय भरणे, महेश भंडारकवठेकर, मुकुंद पुजारी, संजय इनामदार, रवींद्र गायकवाड, आशुतोष देशपांडे, महेश परिचारक, अमर ठाकूर, उदयसिंह राजपूत, भारतसिंह राजपूत, रणजितसिंह ठाकूर, रवींद्रसिंग ठाकूर, रवींद्रसिंह राजपूत, प्रशांतसिंह राजपूत, संतोषसिंह चंदेले, दिलीपसिंह चंदेले आदी उपस्थित होते. 

उपरी (ता.पंढरपूर) येथे आज सकाळी श्रीराम मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने दोन हजार लाडूंचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. आज घरोघरी रामजन्भूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद साजरा करण्यात आला. साहेबराव जगदाळे, महेश नागणे, विक्रांत जगदाळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तालुक्‍यातील अन्य गावांतही आज विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल