
राज्यात प्राथमिक शिक्षक संघटना सक्षम आहेत. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात संघटना पटाईत आहेत. मात्र, मागील सरकारने संघटनांना फारसे महत्त्व दिले नव्हते. पण, सरकार बदलल्यानंतर संघटना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. संघटनांशी जवळीक असलेल्या राजकीय नेत्यांशी संपर्क साधत संघटनांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही संघटनांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन यंदाच्या वर्षी केवळ आपसी बदल्याच कराव्यात अशी विनंती केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मंत्र्यांनी दिल्याची चर्चा शिक्षकांच्या वर्तुळात आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत कोणताही शासन आदेश किंवा परिपत्रक निघाले नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या वर्षी बदल्या होणार की नाही? झाल्याच तर कोणत्या प्रकारच्या होणार? याबाबतही अनिश्चितता आहे.
मंत्री म्हणाले, गुरुजींच्या आपसी बदल्या करू; मात्र आदेश निघत नसल्याने वाढला गोंधळ !
सोलापूर : मागील युती सरकारच्या काळात शिक्षकांच्या बदल्या या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यात नव्याने सरकार स्थापन होताच यंदाच्या वर्षी शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने 31 जुलैपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. त्याला आता 10 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, संघटनांनी ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठका घेऊन केवळ आपसी बदल्या करण्यावर मंत्र्यांना राजी केल्याची चर्चा आहे. पण, अद्यापही त्याबाबतचा आदेश निघाला नाही. त्यामुळे राज्यातील जवळपास तीन-चार लाख प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय तळ्यात-मळ्यात असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा : केवळ "या' कारणामुळे एक्स्पोर्टर बनले मजूर! परिणामी चीन बांगलादेशाचा घेतो तसा "या' शहराचा फायदा घेतात "ही' राज्ये
राज्यात प्राथमिक शिक्षक संघटना सक्षम आहेत. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात संघटना पटाईत आहेत. मात्र, मागील सरकारने संघटनांना फारसे महत्त्व दिले नव्हते. पण, सरकार बदलल्यानंतर संघटना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. संघटनांशी जवळीक असलेल्या राजकीय नेत्यांशी संपर्क साधत संघटनांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही संघटनांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन यंदाच्या वर्षी केवळ आपसी बदल्याच कराव्यात अशी विनंती केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मंत्र्यांनी दिल्याची चर्चा शिक्षकांच्या वर्तुळात आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत कोणताही शासन आदेश किंवा परिपत्रक निघाले नसल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या वर्षी बदल्या होणार की नाही? झाल्याच तर कोणत्या प्रकारच्या होणार? याबाबतही अनिश्चितता आहे. शासनाने 15 टक्के बदल्या करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये आपसी, विनंती व प्रशासकीय बदल्यांचा समावेश होतो. पण, यापैकी कुठल्या बदल्या होणार, हे अद्यापही अनुत्तरीतच आहे.
हेही वाचा : "कॅडबरी', "नॅशनल कॅश रजिस्टर'सारखी रचना होती नजरेसमोर... त्यातूनच आली किर्लोस्करवाडी जन्माला
बदल्या लांबणीवर पडणार?
यंदाच्या वर्षी कोरोनाने हाहाकार घातला आहे. शाळा कधी सुरू होतील याचा भरवसा नाही. त्यातच शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, शिक्षण विभागाचे याबाबतचे कामकाज संथ गतीने सुरू आहे. या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने पाहिले असता यंदाच्या वर्षीच्या बदल्या लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड म्हणाले, शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात शासनाने परिपत्रक दिले आहे. त्या परिपत्रकाप्रमाणे बदल्यांची पूर्वतयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Web Title: Government Orders Transfers Though Uncertainty Over Teacher Transfers State
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..