राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत "या' हॉस्पिटलमधील दोन कर्मचाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल 

hospital
hospital
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर शहरातील अधिग्रहित केलेल्या ऍपेक्‍स हॉस्पिटलमधील ब्रदर आणि सिस्टर अशा दोन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधूनदेखील ते दोघे हॉस्पिटलमधील त्यांच्या कामावर हजर न झाल्याने पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार विजय जमादार यांनी दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. 

शहर व तालुक्‍यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आणि रुग्णांच्या उपचारासाठी प्रशासनाने शहरातील काही हॉस्पिटलमधील डॉक्‍टर, परिचारिका आणि इतर स्टाफ यांची सेवा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत अधिग्रहित केली आहे. त्यापैकी पंढरपूर शहरातील ऍपेक्‍स हॉस्पिटलमधील सिस्टर अंजना तिवरासे (रा. तारापूर, ता.पंढरपूर) आणि ब्रदर आनंद ओहाळ (रा. शेटफळ, ता. मोहोळ) यांच्याशी 27 जुलैपासून संपर्क करून देखील हे दोघे त्यांच्या हॉस्पिटलमधील अत्यावश्‍यक सेवेसाठी हजर झाले नाहीत. त्यांना नेमून दिलेल्या कामात गैरहजर राहून कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केली. या कारणावरून या दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार विजय जमादार यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, त्यावरून पोलिसांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना डॉक्‍टर अथवा अधिग्रहित केलेल्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला तर संबंधित डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तशी वेळ संबंधितांनी येऊ देऊ नये; अन्यथा नाइलाजास्तव कडक कारवाई करणे भाग पडेल, असा इशारा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pandharpur
One-Sided Obsession Ends in Murder; Family Loses Its Sole Breadwinner
Solapur
Dr. Shirish Valsangkar family's
Marathi News Esakal
www.esakal.com