
सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आज एक हजार 418 संशयितांमध्ये 239 जण पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीणमध्ये चार हजार 209 संशयितांमध्ये 377 बाधित आढळले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीणची रुग्णसंख्या आता 45 हजार 305 झाली असून त्यापैकी 41 हजार 36 रुग्ण बरे झाले असून तीन हजार 40 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रात्रीची संचारबंदी आणि दुकाने सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश काढले असतानाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ठळक बाबी...
शहरातील विजयपूर रोड, महिला वसतीगृह, अंत्रोळीकर नगर, सिव्हिल क्वॉर्टर्स, होटगी रोड, मोदी रेल्वे कॉलनी, भारती विद्यापीठाजवळ, वेणूगोपाळ नगर, बाळीवेस (बुधवार पेठ), भुबणे चाळ (भैय्या चौक), धनराज गिरजी हॉस्पिटलजवळ, दिक्षित हॉस्पिटलजवळ (लिमयेवाडी), रूबी नगर, शिवगंगा नगर, मनमीत अपार्टमेंट, पदमराज पार्क, दावत पार्क, सिंधु विहार, चंडक पार्क, सहवास नगर, मोनार्क हॉस्पिटलजवळ (जुळे सोलापूर), सिव्हिल हॉस्पिटलजवळ (न्यू पाच्छा पेठ), जवाहर नगर, कामाक्षी नगर (शेळगी), हनुमान नगर, घोंगडे वस्ती, जम्मा वस्ती (भवानी पेठ), लिमयेवाडी (वांगी रोड), पेंटर चौक (शनिवार पेठ), राजलक्ष्मी टॉवर, दक्षिण सदर बझार (लष्कर), सिमला नगर, वसंतराव नगर, सदिच्छा नगर, संतोष नगर, अनंत नगर, माशाळ नगर, नरेंद्र नगर, सिध्देश्वर नगर, द्वारका नगरी, वसंत नगर, आदित्य नगर, सुंदरम नगर (विजयपूर रोड), सतनाम चौक (ढोर गल्ली), धमश्री लाईन (मुरारजी पेठ), दक्षिण कसबा, टिळक चौक, उत्तर कसबा, विनस अपार्टमेंट (जुना आरटीओ कार्यालयमागे), भोसगी नगर, कुमठे (कुमठे), नेहा अपार्टमेंट (विकास नगर), सात रस्ता, आशा नगर, न्यू संतोष नगर, अंबिका नगर, श्रध्दा एलिगन्सी, आकाश नगर, तोडकर वस्ती (बाळे), जिजामाता नगर (कुमठा नाका), निर्मिती गणेश नगर (राजस्व नगर रोड), मंजुनाथ नगर, रामलिंग नगर, भूषण नगर, वंदना अपार्टमेंट, सेटलमेंट फ्रि कॉलनी, वसंत विहार (निखील थोबडे वस्ती), दोन नंबर झोपडपट्टी, साठे-शिंदे वस्ती (देगाव रोड), मोठी इरण्णा वस्ती, गुरुदत्त नगर (आयएमएसजवळ), शिक्षक सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर (सैफूल), रेल्वे सोसायटी (दर्बी कॉलनी), जवाहर नगर (प्रगती चौक), किसान नगर (विडी घरकूल), सत्य साईबाबा नगर (अक्कलकोट रोड), गंगा चौक (निलम नगर), अंलकापुरी (लक्ष्मी पेठ), यश नगर भाग-दोन, सनसिटी (दमाणी नगर), गुलमोहर वसंत विहार, गंगा नगर (जुना देगाव नाका), सिध्देश्वर मंदिराजवळ, एनजी मिल सोसायटी (आसरा), सहारा नगर, हराळे नगर, सिध्देश्वर गांधी नगर (मजरेवाडी), देव नगर (सोरेगाव), ओम नम:शिवाय नगर (हत्तुरे वस्ती), गणेश बिल्डर्स, शुक्रवार पेठ, कल्याण नगर भाग-दोन, प्रियंका नगर, एसआरपी कॅम्प, राणा प्रताप नगर, जुना संतोष नगर, रीच हेरिटेज पाम सोसायटी, कित्तूर चनम्मा नगर (सैफूल), रमाबाई आंबेडकर नगर, काडादी चाळ (रेल्वे लाईन), श्री अपार्टमेंट (एकता नगर), शनिवार पेठ (विडी घरकूलजवळ), दत्त नगर, आदर्श नगर (उत्तर सदर बझार), इंद्रायणी अपार्टमेंट (दक्षिण कसबा), पोस्टल कॉलनी (शेटे नगर), सायली अपार्टमेंट, किल्लेदार नगर (होटगी रोड), धोंडिबा वस्ती (मरिआई मंदिराजवळ), रेल्वे लाईन, लेप्रेसी कॉलनी, मार्कंडेय नगर, पंचशिल नगर (कुमठा नाका), गुलमोहर अपार्टमेंट (सात रस्ता), उध्दार सोसायटी, मौलाली चौक, अभिषेक नगर (पुना नाका), रविवार पेठ, मानस अपार्टमेंट (जुना एम्प्लॉयमेंट चौक), उमानंदा अपार्टमेंट (डफरीन चौक), जोशी गल्ली (उत्तर कसबा), नाथ संकुल अपार्टमेंट, साखर पेठ, भारतरत्न इंदिरा नगर, अक्कलकोट रोड, रंगराज नगर, लक्ष्मी चौक (विडी घरकूल), शिवाजी नगर (मोदी), मोदी कॉलनी, नेहरू नगर, विद्या नगर, पी.जी. हॉस्टेल, बाईज हॉस्टेल आणि सिध्दार्थ सोसायटी या ठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.