ब्रेकिंग : पंढरपूर तालुक्‍यात कोरोनाचा प्रवेश; उपरीतील युवक बाधित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

दोन महिने प्रशासनाला आले होते यश​
मागील दोन महिन्यापासून कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे पंढरपूर व तालुका कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. गेल्या दोन महिन्यात मुंबई व पुण्याहून अनेक लोक तालुक्‍यात आले. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पंढरपूर तालुका कोरोनापासून मुक्त होता. मात्र, आज अखेर कोरोनाने पंढरपूर तालुक्‍यात प्रवेश केला आहे. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील उपरी येथे मुंबईहून आलेल्या एका तरूणाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्‍यात एकच खळखळ उडाली आहे. 
मागील दोन महिन्यापासून कडेकोट बंदोबस्त ठेवल्यामुळे पंढरपूर व तालुका कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. गेल्या दोन महिन्यात मुंबई व पुण्याहून अनेक लोक तालुक्‍यात आले. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पंढरपूर तालुका कोरोनापासून मुक्त होता. दरम्यान, मागील तीन चार दिवसांपूर्वी एक तरूण मुंबईहून उपरी येथे आला होता. दोन दिवसापूर्वी त्याला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. तपासणीमध्ये त्याचा कोरोपा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे आज निष्पन्न झाले आहे. 
तालुक्‍यात कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रशासनाने उपरी परिसर व बाजूचा तीन किलोमीटर परिसर सील केला असल्याची माहिती आहे, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona enters Pandharpur taluka youth from corona positive