कोरोना इफेक्ट : येथील श्री खंडोबा मंदीर दर्शनासाठी बंद 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 20 मार्च 2020

पौष शुद्ध षष्ठी म्हणजे बांगर षष्ठी महाप्रसाद करून सर्व पाटील, तोडकरी, कांबळे, सुरवसे, गावडे आदी मानकरी व भाविक यात्रेकरूंना प्रसाद वाटप करून यात्रेची सांगता केली जाते. 

सोलापूर : कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बाळे देवस्थान मंदीर 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. देवस्थान समितीेचे अध्यक्ष विनय ढेपे व सचिव गणेश पुजारी यांनी ही माहिती दिली. तसा फलक मंदीराच्या प्रवेशद्वारासमोर लावण्यात आला आहे. 

 

बाळे येथील जागृत देवस्थान खंडोबाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी ते षष्ठी दरम्यान मोठ्या उत्साहात होत असते. मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या रविवारी भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक रविवार ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र या तीन राज्यांतून भविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी यात्रेस येत असतात. यात्रेच्या कालावधी व्यतिरीक्त प्रत्येक रविवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. 

हेही वाचा - अशी भरते श्री क्षेत्र बाळे खंडोबाची यात्रा 

या कालावधीत पहाटे पाच वाजून 30 मिनिटांनी "श्रीं'ची काकड आरती, सकाळी ठीक आठ वाजता व रात्री सात वाजता दोन वेळा महापूजा, अभिषेक करण्यात आला तसेच दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या मुरळी नाचणे, तळी भंडारा उचलणे, वारू सोडणे, नवस फेडणे व जावळ काढणे आदी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. तसेच रात्री आठ वाजता श्री खंडोबा देवाची पालखी घोडा व विद्युत रोषणाईने सोलापूर येथून आलेले मानाचे नंदीध्वज मिरवणूकसह धार्मिक लंगर तोडणे विधी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. तिसऱ्या रविवारी रात्री ठीक आठ वाजता शोभेच्या दारूची रोषणाई केली जाते. 

मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक व यात्रेकरूंच्या दर्शनाच्या सोयीसाठी चोख पोलिस बंदोबस्त, सोलापूर महानगरपालिकेकडून सिटी बस सेवा, पाण्याची सोय तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचबरोबर समस्त पुजारी मंडळी यात्रा कालावधीत भाविक यात्रेकरूंच्या दर्शनाच्या व विविध विधींच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण दिवसभर सहभागी होऊन यात्रेचे व्यवस्थितरीत्या नियोजन करीत असतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona feefct The Khandoba Temple at Sri Kshetra Bale solapur closed upto 31st march