सोलापूर शहर, जिल्ह्यातील "कोरोना मुक्त'ने ओलांडला 35 हजाराचा टप्पा 

प्रमोद बोडके
Wednesday, 28 October 2020

सध्या फक्त 3286 रुग्ण 
सोलापूर महापालिका हद्दीतील 445 तर ग्रामीण भागात 2 हजार 841 असे एकूण 3 हजार 286 एवढेच ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्ण सध्या शहर व जिल्ह्यात आहेत. या रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. 

सोलापूर : सोलापूर महापालिका हद्दीतील 8 हजार 508 व ग्रामीण भागातील 26 हजार 499 अशा एकूण 35 हजार सात जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आज 35 हजार सात वर गेली आहे. एकाच दिवशी 195 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 

आज कोरोना मुक्त झालेल्यांमध्ये ग्रामीण भागातील 175 तर महापालिका हद्दीतील 20 जणांचा समावेश आहे. आजच्या अहवालानुसार दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यातील सहा जण ग्रामीण भागातील तर चार जण महापालिका हद्दीतील आहेत. महापालिका हद्दीतील एकूण मृतांची संख्या 532 तर ग्रामीण भागातील मृतांची संख्या 901 झाली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील 1 हजार 433 जणांचा कोरोनामुळे आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्यातील बाधितांची संख्या 39 हजार 726 झाली असून त्यामध्ये ग्रामीण भागातील 30 हजार 241 तर महापालिका हद्दीतील 9 हजार 485 जणांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे 39 अहवाल अद्यापही प्रलंबित असून हे सर्व अहवाल ग्रामीण भागातील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Corona free" in Solapur city, district crossed the 35,000 mark