शहरात कमी होऊ लागला कोरोनाचा संसर्ग ! आज 31 जण पॉझिटिव्ह; 56 वर्षांवरील चौघांचा मृत्यू

तात्या लांडगे
Wednesday, 14 October 2020

ठळक बाबी... 

 • शहरातील 86 हजार 520 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत शहरातील पाच हजार 380 पुरुषांना तर तीन हजार 758 महिलांना कोरोनाची बाधा 
 • शहरातील 340 पुरुष आणि 171 महिलांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
 • आतापर्यंत शहरातील सात हजार 893 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
 • आज शहरात चारजणांचा मृत्यू तर 31 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
 • शहरात सध्या 101 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये तर 95 व्यक्‍ती इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये 

सोलापूर : शहरातील 56 वर्षांवरील चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 511 झाली आहे. 606 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 31 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. शहरातील कोरोनाचा संसर्ग आता कमी होऊ लागला आहे. मात्र, को- मॉर्बिड रुग्ण अद्यापही कोरोनाचे बळी ठरत असून 56 वर्षांवरील चौघांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक बाबी... 

 • शहरातील 86 हजार 520 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
 • आतापर्यंत शहरातील पाच हजार 380 पुरुषांना तर तीन हजार 758 महिलांना कोरोनाची बाधा 
 • शहरातील 340 पुरुष आणि 171 महिलांचा कोरोनामुळे झाला मृत्यू 
 • आतापर्यंत शहरातील सात हजार 893 रुग्णांनी केली कोरोनावर मात 
 • आज शहरात चारजणांचा मृत्यू तर 31 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह 
 • शहरात सध्या 101 संशयित होम क्‍वारंटाईनमध्ये तर 95 व्यक्‍ती इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये 

शहरात आज राघवेंद्र नगर, कित्तूर चनम्मा नगर (सैफूल), कुर्बान हुसेन नगर, अनुविश्‍व सोसायटी, सुशिल नगर, एसआरपी कॅम्पजवळ (विजयपूर रोड), इंदिरा नगर, बजरंग नगर (होटगी रोड), मिरा नगर, जुळे सोलापूर, स्वामी विवेकानंद नगर, द्वारका नगरी, कविता नगर, पद्मा नगर, अवसे वस्ती (आंबराई), गीता नगर, हिरा मोती टॉवर, खड्डा तालिमजवळ (पाच्छा पेठ), धोंडीबा वस्ती, शिवाजी चौक, ऍपेक्‍स हॉस्पिटलजवळ, शंकर नगर (होटगी रोड), पी. जी. हॉस्टेल, देशमुख- पाटील वस्ती (देगाव नाका), हुच्चेश्‍वर नगर, विद्या नगर (शेळगी) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात आज न्यू पाच्छा पेठेतीलल खड्डा तालिमजवळील 56 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला गळा कापलेल्या आवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर रेल्वे लाईन्स परिसरातील 77 वर्षीय पुरुष, जुळे सोलापुरातील भारती विद्यापीठाजवळील 78 वर्षीय पुरुषाचा आणि मंत्री चंडक नगरातील 63 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infection in the solapur city decreased; Today, 31 people are positive