esakal | कोरोना तपासणीची प्रयोगशाळा आता सोलापुरात 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Investigation Laboratory in Solapur

प्रयोगशाळेचा लाभ कायमस्वरूपी 
सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होणाऱ्या प्रयोगशाळेसाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. उद्यापासून (सोमवार) प्रयोगशाळेच्या अंतर्गत कामाला सुरवात होणार आहे. "व्हायरल रिसर्च डायग्नॉस्टिक लॅब नावाने' ही प्रयोगशाळा ओळखली जाणार आहे. या ठिकाणी कोरोना, स्वाइन फ्लू यासह अन्य साथीच्या आजारांची चाचणी केली जाणार आहे. या प्रयोग शाळेचा लाभ सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना व कर्नाटकातील काही जिल्ह्यांना होणार आहे.

कोरोना तपासणीची प्रयोगशाळा आता सोलापुरात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : करोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र कोवीड- 19 उपाययोजना अधिसूचना लागू झाल्याने आवश्‍यकता भासल्यास विलगीकरणासाठी खासगी रुग्णालयातील बेडस्‌ अधिग्रहीत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले आहेत. राज्यात सध्या 32 रुग्ण आढळले आहेत. संशयित रुग्णांच्या चाचण्यांसाठी येत्या 15 दिवसांत सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. 
सोलापूरसह धुळे, औरंगाबाद व मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयांत कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई येथील कस्तुरबा गांधी रुग्णालय प्रयोगशाळेत चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी बुधवारपासून यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. येथे दिवसाला 350 चाचण्या करता येणार आहेत. यासोबतच के. ई. एम. रुग्णालयात दिवसाला 250 चाचण्या होतील अशी यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. 15 ते 20 दिवसात जे. जे. रुग्णालय, हाफकिन इन्स्टिट्यूट आणि पुणे येथील बीजे महाविद्यालयात चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
 
प्रयोगशाळेचा लाभ कायमस्वरूपी 
सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू होणाऱ्या प्रयोगशाळेसाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. सोमवार प्रयोगशाळेच्या अंतर्गत कामाला सुरवात होणार आहे. "व्हायरल रिसर्च डायग्नॉस्टिक लॅब नावाने' ही प्रयोगशाळा ओळखली जाणार आहे. या ठिकाणी कोरोना, स्वाइन फ्लू यासह अन्य साथीच्या आजारांची चाचणी केली जाणार आहे. या प्रयोग शाळेचा लाभ सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना व कर्नाटकातील काही जिल्ह्यांना होणार आहे.