कोरोना : प्रिसिजनची एक कोटींची मदत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

आरोग्य सेवेला प्रिसिजनची मदत 
प्रिसिजन कंपनीकडून आरोग्यक्षेत्रात भरीव काम करण्यात आले आहे. सोलापुरातील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात डायलिसिस वॉर्डनिर्मिती, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कर्णबधीरत्वाचे निदान करणारी बेरा टेस्टिंग मशिन, स्थूलपणा सर्जरीशी निगडित बॅरिऍट्रिक मशिन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

सोलापूर : कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यासाठी प्रिसिजन उद्योगसमूहाकडून एक कोटी रुपये मदतनिधी देण्यात आला आहे. यातील 50 लाख रुपये पंतप्रधान सहायता निधी व पन्नास लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले जाणार आहेत. प्रिसिजन उद्योगसमूहाचे अध्यक्ष यतीन शहा यांनी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. 

aschim-maharashtra-news/solapur/one-side-marriage-other-side-lockdown-275949">हेही वाचा - एकीकडे लगीनघाई दुसरीकडे लॉकडॉऊन 
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, कंपनीचे संचालक तथा मुख्य वित्तीय अधिकारी रवींद्र जोशी, कार्यकारी संचालक करण शहा उपस्थित होते. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदतनिधी दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी प्रिसिजन उद्योगसमूहाचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona: One Crore rupees of Precision help